अवर्गीकृत

Women’s Hockey World Cup 2022: India Women’s Hockey Team Campaign Ends With 0-1 Loss To ESP

[ad_1]

Women’s Hockey World Cup 2022: महिला हॉकी विश्वचषकातील क्रॉस ओव्हर सामन्यात  भारतीय संघाला (India Women’s Hockey Team) यजमान स्पेनकडून पराभव पत्करावा लागलाय. या पराभवानंतर भारतीय महिला हॉकी संघाचं महिला हॉकी विश्वचषक 2022 मधील आव्हान संपुष्टात आलं आहे. स्पेननं सामन्याच्या अवघ्या 3 मिनिटे आधी गोल करून भारतीयांच्या आशांवर पाणी फेरलं. महत्वाचं म्हणजे, भारतीय महिला संघाला पूल बी मधील तिन्ही सामन्यात विजय मिळवता आला नाही. या स्पर्धेतील भारताचे सुरुवातीचे दोन्ही सामने अनिर्णित ठरले. मात्र, अखेरच्या सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावा लागलं. 

अखेरच्या तीन मिनिटांत स्पेनचा गोल
स्पेनविरुद्धच्या क्रॉस ओव्हर सामन्यात भारतीय महिला संघानं सुरुवातीला दमदार खेळ दाखवला. दोन्ही संघांमध्ये तीन क्वार्टरपर्यंत बरोबरीची स्पर्धा पाहायला मिळाली. परंतु, चौथ्या कार्टरमध्ये आक्रमकतेनं खेळ करत आपली भूमिका स्पष्ट केली. स्पेननं भारताविरुद्ध सातत्यानं गोल करण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते अपयशी ठरत होते. मात्र, या सामन्यातील अखेरचे तीन मिनिट शिल्लक असताना स्पेननं गोल केला आणि भारताला 1-0 अशा पराभव स्वीकारावा लागला. 

ट्वीट-

भारतीय महिलांची निराशाजनक कामगिरी
महिला हॉकी विश्वचषका 2022 मध्ये भारतीय संघानं निराशाजनक कामगिरी करून दाखवसी. भारताला या स्पर्धेत एकही सामना जिंकता आलेला नाही.पूली बी सामन्यात इंग्लंड आणि चीननं भारतासोबत 1-1 अशी बरोबरी साधली. तर, न्यूझीलंडनं 4-3 नं आणि स्पेननं 1-0 नं भारताला पराभूत केलं.

आता 9व्या ते 16व्या स्थानासाठी लढत
भारतीय संघ आता विश्वचषकात 9व्या ते 16व्या स्थानासाठी इतर संघांशी भिडणार आहे. सोमवारी त्याचा सामना कॅनडाशी होणार आहे. तीनही सामने गमावून कॅनडा पूल-सीमध्ये शेवटच्या स्थानावर आहे.

हे देखील वाचा-

[ad_2]
Source link

वर्तमान महाराष्ट्र

वार्ता सत्याची जनतेच्या हिताची!

Related Articles

Back to top button