पोलिस वार्तामहाराष्ट्र

Latur:पाटोदा वळण पुलाजवळ ट्रक जंपिंग झाल्याने पाटा व टायर तुटून रस्त्यावर आपटला.

शारदा कंट्रक्शनच्या हायवे व रस्ते वळणमुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ

लातुर पाटोदा वळण पुलाजवळ ट्रक जंम्प घेऊन पाटा व टायर तुटुन ट्रक रस्त्यावर आपटला. जिवीत हानी नाही मात्र मोठा अपघात टळला*.”शारदा कंट्रक्शनच्या हायवे रस्ते वळणमुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ “अहमदपूर तालुक्यातील पाटोदा वळण पुलाजवळ ट्रकने वळण घेताना जंम्प घेऊन पाटा व टायर तुटून ट्रक रस्त्यावर आपटला जिवीत हानी नाही मात्र मोठा अपघात टळला असून हे काम शारदा कंट्रक्शनच्या हायवे रस्ते वळणामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे.दि.०२.११.२०२२ रोजी दुपारी ४.०० वाजण्या दरम्यान सोयाबिन भरलेली ट्रक क्र.एम.एच २६ ए.डी – ०७५० हा नांदेडहुन इंदापूरला जात असतांना पाटोदा जवळील वळण पुलाजवळ ट्रक जंम्प घेऊन पाटा व टायर तुटून ट्रक रस्त्यावर आपटला त्यात ड्राव्हर मोहन परशुराम काळम वय – ३५ वर्षे ट्रकमालक माधव शिवाजी घोरबांडे हे दोघे रा.उस्मानगर ता.कंधार बालबाल बचावले.असे अनेक अपघात हायवेच्या वळण रस्त्यामुळे अहमदपूर – अंबाजोगाई हायवे रस्त्यावर घडत आहे त्यात कोपरा नजिकच्या वळण रस्त्यावर बरेच विचीत्र अपघात झाल्याचे चित्र पहावयास मिळते.हायवे रस्ता वळणदार केल्याने वहान जंम्पींग घेऊन अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

वर्तमान महाराष्ट्र

वार्ता सत्याची जनतेच्या हिताची!

Related Articles

Back to top button