अवर्गीकृत

IND vs ENG 3rd T20 Score Live Updates: India vs England 2nd T20 Live Telecast Ball by Ball Commentary Online TV

[ad_1]

India vs England Live : आज भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना खेळवला जात आहे. भारताने मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकत मालिकेत 2-0 ची विजयी आघाडी घेतली आहे. यावेळी पहिल्या टी20 मध्ये भारताने 50 धावांनी तर दुसऱ्या टी20 मध्ये 49 धावांनी विजय मिळवला आहे. ज्यामुळे आजचा सामना जिंकल्यास भारत इंग्लंडला क्लिन स्वीप देईल. तर इंग्लंड किमान आजचा सामना जिंकून मालिकेचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न करेल. दोघांसाठी सामना महत्त्वाचा असल्याने एक चुरशीचा सामना आज पाहायला मिळू शकतो.

नॉटींगहम येथील ट्रेन्ट ब्रिज क्रिकेट स्टेडियमवर आजचा सामना खेळवला जात आहे. याठिकाणची खेळपट्टी सपाट असल्याने फलंदाजांना काही प्रमाणात अधिक फायदा होऊ शकतो. ज्यामुळे एक मोठी धावसंख्या उभी राहण्याची शक्यता आहे. तिनही क्रिकेट प्रकारच्या सामन्यात याठिकाणी मोठी धावसंख्या होताना दिसून आलं आहे. या मैदानावर 2012 मध्ये झालेल्या टी20 सामन्यानंतर थेट 2021 मध्ये पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड हा टी20 सामना पार पडला. तोवर याठिकाणी टी20 सामना पार पडला नव्हता. ज्यानंतर आता पुन्हा एक मोठा आणि महत्त्वाचा टी20 सामना याठिकाणी पार पडणार आहे. फलंदाजांसाठी खेळपट्टी फायद्याची असल्याननाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी घेण्याची अधिक शक्यता आहे.

कशी आहे दोन्ही संघाची अंतिम 11?

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, रवींद्र जाडेजा, हर्षल पटेल, आवेश खान, उमरान मलिक आणि रवी बिश्नोई 

इंग्लंडचा संघ : जेसन रॉय, जोस बटलर (कर्णधार), डेविड मलान, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, ​​​हॅरी ब्रुक, ख्रिस जॉर्डन, डेविड विली, आर. टोप्ले, फिल सॉल्ट आणि रिचर्ड ग्लीसन

हे देखील वाचा- 

[ad_2]
Source link

वर्तमान महाराष्ट्र

वार्ता सत्याची जनतेच्या हिताची!

Related Articles

Back to top button