अवर्गीकृत

IND Vs ENG 3rd T20 Live England Won Toss And Elected To Bat First See Final Playing 11

[ad_1]

India vs England Toss Update : इंग्लंडच्या नॉटींगहम येथील ट्रेन्ट ब्रिज मैदानात पार पडणाऱ्या भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील तिसऱ्या टी20 सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या सामन्यात प्रथम गोलंदाजी घेऊन पराभूत झाल्याने इंग्लंडने आज थोडा वेगळा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघानी अंतिम 11 मध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत.

पहिल्या टी20 मध्ये भारताने 50 धावांनी विजय मिळवल्यानंतर दुसरा सामना भारताने 49 धावांनी जिंकला. ज्यामुळे आजचा सामना जिंकल्यास भारत इंग्लंडला त्याच्यांच भूमीत व्हाईट वॉश देईल. तर इंग्लंड किमान आजचा सामना जिंकून मालिकेचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न करेल. ज्यामुळे दोघांना सामना महत्त्वाचा असल्याने आज एक चुरशीचा सामना पाहायला मिळू शकतो.

कशी आहे दोन्ही संघाची अंतिम 11?

आज होणाऱ्या सामन्यात भारताने पुन्हा एकदा संघात बदल केले आहेत. यावेळी भारताने युवा खेळाडूंना संधी देत दिग्गजांना विश्रांती दिली आहे. यावेळी रवी बिश्नोई, आवेश खान, उमरान मलिक आणि श्रेयस अय्यर यांना संधी मिळाली आहे. ज्यामुळे भुवनेश्वर, बुमराह, चहल आणि हार्दिक यांना विश्रांती देण्यात आली आहे. इंग्लंडनेही दोन बदल संघात केले असून आर टोप्ले आणि फिल सॉल्ट संघात आले असून सॅम करन आणि मॅथ्यू पार्किंसन बेंचवर असतील. तर नेमकी दोन्ही संघाची अंतिम 11 कशी आहे, यावर एक नजर फिरवूया… 

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, रवींद्र जाडेजा, हर्षल पटेल, आवेश खान, उमरान मलिक आणि रवी बिश्नोई 

इंग्लंडचा संघ : जेसन रॉय, जोस बटलर (कर्णधार), डेविड मलान, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, ​​​हॅरी ब्रुक, ख्रिस जॉर्डन, डेविड विली, आर. टोप्ले, फिल सॉल्ट आणि रिचर्ड ग्लीसन

हे देखील वाचा- 

[ad_2]
Source link

वर्तमान महाराष्ट्र

वार्ता सत्याची जनतेच्या हिताची!

Related Articles

Back to top button