लोक प्रेरणा

शहीद जवान राजशेखर मोरे यांच्या कुटुंबीयांना चिंचगव्हाण ग्रामस्थांच्या वतीने ८१ हजार ७७० रुपयाची आर्थिक मदत

मोरे यांच्या कुटुंबीयांना शहरासह ग्रामीण भागातून देखील आर्थिक मदतीचा ओघ सुरू

माजलगाव/ ( वर्तमान महाराष्ट्र ) तालुक्यातील तेलगाव येथील डॉ. दत्तात्रय फपाळ यांचा माजलगाव धरणामध्ये बुडून मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह सापडत नसल्यामुळे कोल्हापूर येथील के. डी. आर. एफ. च्या पथकाने माजलगाव येथे पाचारण केले. याच पथकातील जवान राजशेखर मोरे हे डॉ. फपाळ यांचा शोध घेण्यासाठी पाण्यात उतरले असता मासेमारी करण्यासाठी टाकलेल्या जाळ्यामध्ये अडकून त्यांचा मृत्यू झाला.या दुर्दैवी घटनेमुळे माजलगाव शहरासह जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त होत असून शहरासह ग्रामीण भागात देखील शोकळा पसरली आहे.जवान मोरे यांच्या घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे मोरे यांच्या कुटुंबीयांना शहरासह ग्रामीण भागातून देखील आर्थिक मदतीचा ओघ सुरू असून आज दि. २३ सप्टेंबर रोजी शहीद जवान राजशेखर मोरे यांच्या कुटुंबीयांना चिंचगव्हान ग्रामस्थानच्यावतीने ८१ हजार ७७० रुपयाची मदत जमा केली असून ही रक्कम माजलगाव तहसीलदार मनाळे मॅडम यांना चिंचगव्हाण ग्रामस्थांच्या वतीने सुपूर्द करण्यात आली.यावेळी चिंचगव्हाण ग्रामपंचायत सरपंच पप्पू शिंदे उपसरपंच राजअर्जुन, पत्रकार पांडुरंग, उगले वसंत उगले, रतन सोळंके, दया कांबळे, राजेंद्र डोंगरे, रमेश राठोड, एन. के. शिंदे, नवनाथ शिंदे, शेख शकील हे उपस्थित होते.

Show More

Related Articles

Back to top button