शैक्षणिकसंपादकीय

डॉ. रोहिणी वगरे-कावळे यांचे एम.डी.एस. परीक्षेत घवघवीत यश!

मित्र, मैत्रिणी, नातेवाईक, पारिवारिक सदस्य व शिक्षक या सर्वांकडून सर्व स्तरातून कौतुक

माजलगाव / ( पृथ्वीराज निर्मळ )माजलगाव येथील भागवतराव वगरे यांची कन्या डॉ. रोहिणी वगरे-कावळे यांनी एम.डी.एस.(ओरल आणि मॅक्सिलोफेशियल सर्जरी) या परीक्षेत उत्तीर्ण होऊन यश मिळवले आहे. डॉ. रोहिणी यांनी जुलै २०२२ मध्ये झालेल्या एम.डी.एस. परीक्षेमध्ये औरंगाबाद येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या दंतचिकत्सा महाविद्यालय आणि रुग्णालय व एम.यु.एच.एस. नाशिक युनिव्हर्सिटी येथून चांगल्या गुणवत्तेने पास होऊन घवघवीत यश संपादन केले आहे.

डॉ. रोहिणी वगरे-कावळे यांचे दहावीपर्यंत चे शिक्षण हे श्री सिद्धेश्वर विद्यालय माजलगाव येथून झाले तर बी.डी.एस. चे शिक्षण हे वसंतदादा पाटील दंत महाविद्यालय सांगली येथून पुर्ण केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे मित्र, मैत्रिणी, नातेवाईक, पारिवारिक सदस्य व शिक्षक या सर्वांकडून सर्व स्तरातून कौतुक होत आहे. त्यांच्या या यशाचे श्रेय त्यांचे पती डॉ.सतीश कावळे व परिवारातील सदस्यांना जाते असे त्यांनी यावेळी सांगितले.

Show More

Related Articles

Back to top button