लोक प्रेरणावर्तमान महाराष्ट्रसंपादकीय

रूई येथील एकलव्य संघटनेच्या जाहिर सभेला लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा – भारत फुलमाळी

एकलव्य संघटनेचा भव्य शाखा उदघाटन सोहळा संपन्न होणार आहे. या सभेला एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री शिवाजीराव ढवळे साहेब यांची प्रमुख उपस्थित

सभेला एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री शिवाजीराव ढवळे साहेब यांची प्रमुख उपस्थित लाभणार

माजलगाव ( वर्तमान महाराष्ट्र )

एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य, या संघटनेची गेवराई तालुक्यातील रूई येथे शनिवार दि. १७/९/२०२२ रोजी दुपारी १ वाजता जाहिर सभा व रूई येथे एकलव्य संघटनेचा भव्य शाखा उदघाटन सोहळा संपन्न होणार आहे.
या सभेला एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री शिवाजीराव ढवळे साहेब यांची प्रमुख उपस्थित लाभणार आहे, तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा.अशोकराव बर्डे प्रदेश अध्यक्ष एकलव्य संघटना, मा. बदामराव आबा पंडित माजी राज्यमंत्री, मा. अॅड सुभाष राऊत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद मराठवाडा विभागीय अध्यक्ष तथा बीड जिल्हा अध्यक्ष, मा.सुरेश ठाकर प्रदेश सचिव या मान्यवरांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहणार आहेत.


रूई येथे भव्य शाखा उदघाटन सोहळा व भव्य जाहिर सभा होणार आहे, अदिवासी भिल्ल समाजाच्या प्रमुख मागण्या जात प्रमाणपत्र देण्यात यावे, राहत्या जागा नावाच्या करण्यात याव्यात, शबरी घरकुल योजना प्रत्येकाला देण्यात यावे, भिल्ल वस्त्यांची नोंद तात्काळ करण्यात यावी या अदिवासी भिल्ल समाजाच्या प्रमुख मागण्या संदर्भात या सभेला समाज बांधव येणार आहे.


प्रमुख उपस्थिती मा. कालिदास नवले शिवसेना तालुका अध्यक्ष गेवराई, मा.राम कटारे एकलव्य संघटना प्रसिद्धी प्रमुख बीड जिल्हा, मा. विजय पवार बीड जिल्हा तालुका अध्यक्ष, मा. सचिन फुलमाळी एकलव्य संघटना माजलगाव तालुका अध्यक्ष, रूई शाखा उदघाटक शाखा अध्यक्ष सुभाष दळवी, उपअध्यक्ष नवनाथ राठोड, सचिव भारत राठोड, कार्याध्यक्ष निखील माळी यांच्या सह भारत भाऊ फुलमाळी एकलव्य संघटना बीड जिल्हा अध्यक्ष यांनी बीड जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांना भव्य -दिव्य शाखा उदघाटन सोहळा व जाहीर सभेला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button