पोलिस वार्तावर्तमान महाराष्ट्र

बिल्कीस बानू अत्याचार प्रकरणी केज येथील हाजारो महिलांचा भव्य मोर्चा तहसीलवर धडकला

बिल्कीस बानू यांच्यावर अत्याचार करणाऱ्या व त्यांच्या नातेवाईकांची हत्या करणाऱ्या ११ जणांची केलेली सुटका रद्द करून त्यांना पुन्हा कठोर शिक्षा द्यावी

आत्तापर्यंतच्या सर्वात मोठा ठरलेल्या मोर्चात मुस्लिम महिलांसह राजकीय व सामाजिक संघटना सामिल

प्रतिनिधी..

गेल्या अनेक दिवसांपासून महिलावरील अन्याय अत्याचारात दिवसेंदिवस सातत्याने वाढ होताना दिसत असुन अन्याय अत्याचार रोखण्यात गृहखाते सपशेल अपयशी ठरल्याचे दिसुन येत आहे.
२००२ साली गुजरात राज्यात बिल्कीस बानू नावाच्या मुस्लिम युवतीवर तेथील ११ आरोपींनी सामुहिक पाश्वी बलात्कार करुन तिच्या कुटुंबातील सर्वांची निर्घृणपणे हत्या केली होती. पिडीत बिल्कीस बानू मयत झाल्याचे पाहुन आरोपींनी तेथुन पलायन केले होते.

मात्र या सर्व घटनेतुन बानू हि वाचल्याने तिने पोलीस स्टेशन गाठुन आरोपीविरुद्ध तक्रार दिल्याने कोर्टात सदरील ११ आरोपीवर सदोष मनुष्यवधाचा व बलात्काराचा आरोप सिद्ध होवुन न्यायालयाने वरील सर्व ११ आरोपींना सश्रम अजिवन कारावासाची शिक्षा ठोठावली असताना गुजरात राज्य सरकारने या गुन्ह्यातील आरोपींची वागणूक चांगली असल्याचे कारणावरून सर्वच्या सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केल्याने या निर्णयाविरोधात देशातील मुस्लिम समाजात असंतोष पसरला असुन हा दिलेला निर्णय संविधानाच्या विरोधात आणि लोकशाही पायदळी तुडवत हुकुमशाही पध्दतीने दिला असल्याची खंत व्यक्त करत सर्व महाराष्ट्रभर मुस्लिम समाजासह ईतरही पक्ष संघटना या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. त्याच अनुशंगाने केज शहरातही, दि. १५ सप्टेंबर गुरुवार रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.  
हा मोर्चा हजरत ख्वाजा मोहजबोद्दिन रहे-दर्गा ते तहसील कार्यालय असा काढण्यात आला. या मोर्चात अनेक मागण्या करण्यात आल्या होत्या. त्यात प्रामुख्याने

बिल्कीस बानू यांच्यावर अत्याचार करणाऱ्या व त्यांच्या नातेवाईकांची हत्या करणाऱ्या ११ जणांची केलेली सुटका रद्द करून त्यांना पुन्हा कठोर शिक्षा द्यावी

हजरत मोहम्मद यांच्या विषयी प्रत्येक वेळी अपमानाजनक टिप्पणी करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करून त्यासाठी कठोर कायदा लागू करावा.

भारतातील अल्पसंख्यांक समुदायावर होणाऱ्या अत्याचारा विरुद्ध कडक कायदा करावी
या प्रमुख मागण्यांसाठी केज संविधान संघर्ष बचाव समितीच्या वतीने गुरुवार दि.१५ सप्टेंबर २०२२रोजी सकाळी११वाजता.
हजरत ख्वाजा मोहजबोद्दिन रहे-दर्गा पासुन तहसिल कार्यालयावर हातात काळे झेंडे घेवुन महिलांचा भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला होता.केज शहरातील निघालेल्या महीलांच्या सर्वात मोठ्या निषेध मोर्च्याने केज शहर हादरून गेले होते. या मोर्चाची सुरुवात ख्वाजा मोहजबोद्दिन रहे-दर्गा सुरुवात येथून करण्यात आली. तर हा मोर्चा दुपारी १२:०० वा. केज तहसील कार्यालयावर धडकला नंतर या मोर्चाचे रुपांतर सभेत झाले.
या मोर्चात मुस्लिम महिलासह पुरुष, विद्यार्थी हाजोरोच्या संख्येने सहभागी झाले होते. या मोर्चाला सर्वपक्षीय पाठिंबा दिल्याने केज शहरातील आत्तापर्यंतचा हा सर्वात मोठा आणि शांततामय मोर्चा ठरला आहे.


हा मोर्चा शांततेत पार पडावा यासाठी पोलिस प्रशासनाने तगडा पोलिस बंदोबस्त ठेवला होता. या मोर्चात जनविकासचे सर्वेसर्वा हारुणभाई ईनामदार , नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड , हानुमंत भोसले, आदींची प्रमुख उपस्थिती होती. तर या मोर्चाला शिवसंग्राम , रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) , आणि ईतर सामाजिक राजकीय पक्ष,संघटनांनी पाठिंबा दिला. या मोर्चातील मागण्यांचे निवेदन केज तहसीलचे नायबतहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी श्री. लक्ष्मण धस यांना देण्यात आले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button