अवस्था आणि व्यवस्था

माजलगाव तालुक्यातील जायकवाडी ग्रा प हरकी निमगाव येथील पाणी पुरवठा कामाची चौकशी करण्याचे जिल्हाअधिकारी यांचे आदेश

माजलगाव /प्रतिनिधी

माजलगांव तालुक्यातील जायकवाडी प्रा. प. हरकी निमगाव येथील जलजीवन मिशन पाणी पुरवठा योजनेच्या कामाची चौकशी करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीड यांना एका पत्राद्वारे आदेश आदेश देण्यात आले आहेत
या विषयी माहीती अशी की , माजलगाव तालुक्यातील जायवाडी ग्रा प हरकीनिमगाव येथील जलजीवन मिशन पाणी पुरवठा टेंडर दि. २२ जुलै २०२२ रोजी ओपन झाले असून ते श्री जगदंबा कन्ट्रक्शन या संस्थेवर कार्यारंभ आदेश देण्यात आलेले आहेत जगदंबा कन्स्ट्रक्शन ची नोंदणी बोगस असुन या ठेकेदाराने बोगस वर्कडन सकॅनिंग द्वारे सॉलव्हन्सी व इतर कागदपत्र जोडून ठेकेदारी फर्मची नोंदणी केलेली आहे. व ठेकेदाराच्या नावे अनेक पोलीस गुन्हे दाखल आहेत. परंतु ठेकेदाराने माझ्यावर कुठलाही फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल नसले बाबत पाचशे रु. बॉन्डवर शपथपत्रा दाखल करुन ग्रा.प.क. वि.ची. फसवणूक करुन अनेक गावातील न यो चे कार्यारंभ आदेश मिळविले आहेत. व आमच्या गावात वजा नऊ टक्के दराने निविदा भराने आमचेही काम मिळवीले आहे. श्री ज्ञानेश्वर भागवत अरबड रा. माटेगाव ता. गेवराई यानी त्यांच्या गावाची ई-निविदा बोगस कागदपत्रे जोडून मिळवली असल्याने त्यांनी खंडपीठ औरंगाबाद येथे न्यायालयीन याचिका क्र. डब्लू पी न. ७४१७ सन २०२२ नुसार याचिका दाखल होती. व या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने या ठेकेदाराचे नोंदणी बोगस असल्याने त्यांच्यावर कार्यवाही दिनांक, ३० ऑगस्ट २०२२ पर्यंत करावी करीता आदेश दिलेले आहेत. त्यामुळे या ठेकेदाराला आमच्या गावातील न.यो. चे कार्यारंभ आदेश रदद करुन त्यांचा सामावेश काळया यादीत करावा हि विनंती.
परंतु सदरील प्रस्तावित कामात पुर्ण बोगस इस्टीमेट तयार केले आहे विहीर, पाईपलाईन व अन्य घटकाची गरज नसतांना आणि महत्वाचे या तलावातून दोन पाईपलाईन आणि तीन विहीर चांगल्या स्थितीत असतानी गावाला आणि सांडपाणी आहे. पण तलावात पाणी नसल्यावर या योजना कोरड्या पडतात हे माहित असताना सुध्दा नवीन जलजीवन मिशन हि योजना याच तलावातून प्रस्तावित केली म्हणून हि योजना रद्द करावी आदी मागण्या पूर्ण न केल्यास गावातील सखाराम बाबूलाल चव्हाण , अशोक महादेव मोरे व विलास भाऊराव धनवडे यांनी आमरण उपोषणाचा इशारा ही देण्यात आला होता याचीच दखल घेऊन मा जिल्हाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी बीड यांना दि ११ऑगस्ट २०२२ (क्र २०२२ / आरबी – डेस्क – १ /पोल – निवेदन /कावी- ३९९९७ ) रोजी पत्र काडून वरील प्रकरणी सखोल चौकशी करून आव्हाल सादर करावेत आसे पत्र काढले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button