आपला जिल्हालोक प्रेरणा

अंबाजोगाई’त संघर्ष भूमीवर भाद्रपद पौर्णिमा उत्साहात साजरी !

अंबाजोगाई : संघर्षभूमी येथे प्रत्येक पौर्णिमे मोठ्या उत्साहाने व विविध उपक्रमाने साजरी केल्या जाते. आज सायंकाळी भाद्रपद पौर्णिमा महोत्सवही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस तथागत बुध्द व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना ॲड. शाम तांगडे व गुलाबराव गायकवाड यांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आले. नंतर सामुहीक वंदना घेण्यात आली. याप्रसंगी ॲड. संदीप थोरात यांनी ‘तथागत बुद्धांचा राजा प्रसेनजित यांना उपदेश’ या विषयावर देसना दिली. शेवटी सर्वांनी सामुहीक अल्पोपहाराचा आनंद घेतला.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व तांत्रिक व्यवस्थापन संजय हातागळे यांनी केले. तर तर डॉ किर्तीराज लोणारे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ॲड. शाम तांगडे, गुलाबराव गायकवाड, डॉ विनोद जोगदंड, बबनराव ठोके, महादेव तरकसे, मोतीराम घाडगे, विश्वनाथ सावंत, पांडूरंग लांडगे, सरस्वतीताई लांडगे, सुषमाताई गायकवाड , द्रुपदाआई सरवदे आदींनी विशेष प्रयत्न केले. या कार्यक्रमात ऑनलाईन पद्धतीने – औरंगाबाद येथून अनिताई दिवेकर यांनी सहभाग घेतला. तसेच मुंबई येथून प्रमोद बनसोडे व औरंगाबाद येथून विजय राऊत यांनी सहभाग घेतला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button