वर्तमान महाराष्ट्र

वाढदिसानिमित्त वैचारीक मार्गदर्शन आणि काव्यवाचन हा नवा पायंडा डॉ जितीन वंजारे यांनी पाडला- नितीन चंदनशिवे

वाढदिसानिमित्त वैचारीक मार्गदर्शन आणि काव्यवाचन हा नवा पायंडा डॉ जितीन वंजारे यांनी पाडला- नितीन चंदनशिवे
वाढदिवसानिमित्त वैचारिक मार्गदर्शन आणि काव्यवाचन ठेवणे लोकांचं वैचारीक परिवर्तन करणे, समाजामध्ये वैचारिक परिवर्तन करणे,शाहू, फुले आंबेडकर विचार तळागळामध्ये पोहोचण्यासाठी संविधान जनजागृती करण्यासाठी असे कार्यक्रम होण काळाची गरज आहे डॉ जितीन वंजारे खालापूरीकर यांनी ठेवलेला सम्राटपूत्र राजरत्न जितीन वंजारे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात वैचारिक मार्गदर्शनपर काव्यवाचन हा कार्यक्रम आगळावेगळा आहे.त्यामुळे समाजात वैचारिक क्रांती उदयास येईल आणि हा नवा पायंडा बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात पसरेल असे विचार कवी नितीन चंदनशिवे यांनी बोलताना व्यक्त केले.


दलित, शोषित, पिडीतांची समस्या, त्यांच्यावर झालेली अत्याचार अन्याय व सध्याही होत असलेले अत्याचार स्वतःच्या लेखणीतून जगापर्यंत कवितेच्या माध्यमातून पोहोचवणारे श्रेष्ठ कवी नितीन चंदनशिवे यांनी दोन पात्राच्या आधारे जुन्या काळातील आणि नवीन काळातील मागासवर्गावर होणारे अत्याचार अन्याय यावर भाष्य व्यक्त केले ते वेगवेगळ्या कवितेच्या माध्यमातून कांबळे आणि नाना या दोन पात्राच्या आधारे समजून सांगितले.कांबळे हे एक पात्र ज्याच्या वरती सतत अन्याय अत्याचार झाला परंतु तो कधीही खचला नाही तो ताट मानेने जगत आला. शिव-शाहू-फुले-आंबेडकरी विचार शेवट मध्ये पर्यंत त्यांनी सोडले नाही त्या विचाराची पुढच्या पिढीला सुद्धा पेरणी करून समाजाप्रती सेवाभाव अर्पित करून ताठ मानेने जगणं काय असतं हे दाखवून देणारी अतिशय सुंदर कविता सादर केली.

त्याचबरोबर नाना हे दुसरे पात्र ज्या वरती सतत अन्य अत्याचार झाला शैक्षणिक क्षेत्रामध्ये असे नाना बऱ्याच संख्येने आपल्याला जगामध्ये दिसतात ज्यांच्या वरती या सामाजिक व्यवस्थेने सतत मार दिलेला आहे. परंतु तोच नाना पेटून उठून शाहू फुले आंबेडकरी विचार आत्मसात करून एका विशिष्ट पदापर्यंत पोहोचतो, मोठा अधिकारी बनतो मोठा नेता बनतो आणि समाजाला देशाला संविधानाच्या माध्यमातून न्याय देतो. अशा पद्धतीने आपल्या आक्रमक शैलीत कवी नितीन चंदनशिवे यांनी आपले विचार व्यक्त केले. जातिवाद, रंगभेद, प्रांतवाद,शासकीय क्षेत्रातील मागासवर्गाची कमतरता, राजकिय क्षेत्रात मागासवर्गाची कमतरता, समाजातील अनिष्ट रूढी परंपरा आणि महापुरुषांचे विचार आत्मसात करण्यासाठी सामाजिक चळवळ तयार झाली पाहिजे अशी खंतही यावेळी त्यांनी व्यक्त केली. तसेच अशी समाजप्रबोधनपर कार्यक्रम सम्राट पूत्र राजरत्न याच्या वाढदिवसानिमीत्त डॉ जितीन वंजारे यांनी आयोजित केला.

हा बीड साठी नवा पायंडा आहे तो इतरांनीही पाळावा असे मत व्यक्त केले. समाज बदलण्यासाठी वैचारिक क्रांती महत्त्वाची असते माणसाने महापुरुष डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घेऊन त्यांचे विचार तळागळामध्ये पोहोचले पाहिजेत महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या 22 प्रतिज्ञा तसेच भगवान गौतम बुद्ध यांनी माणसाला जगण्यासाठी दिलेला मानवतेचा संदेश व माणसाला जगण्यासाठी दिलेला विशेष मार्ग पंचशील ग्रहण करून मनुष्य जीवन सुखकर करायला पाहिजे असे विचार चळवळीतील मार्गदर्शक प्रशांत वासनिक यांनी व्यक्त केले. सामाजिक क्षेत्रामध्ये स्वतःची हानी त्याग आणि समर्पण महत्त्वाचे असते असे विचार शिवराज बांगर यांनी व्यक्त केले. जिवनात परोपकारीपना, माणुसकीधर्म, एकमेका सहकार्य करण्याची भावना ठेऊन समाजकार्य केले पाहिजे असे विचार सामाजिक कार्यकर्ते अशोक येडे यांनी व्यक्त केले.

सामाजिक काम करता करता राजकिय क्षेत्रात वैचारीक लोकं घुसली पाहीजेत घराणेशाही सोडून सामान्यांना न्याय मिळाला पाहिजे असे विचार कवी ज्ञानेश्वर राउत यांनी व्यक्त केले जगाचा पोशिंदा शेतकरी कष्टकरी आहे तोच जगाचा आधार आहे असे विचार टिक टॉक स्टार कोंडिराम वाघमोडे यांनी व्यक्त केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगाधर सरवदे तर आभार प्रदर्शन डॉ.रमेश शिंदे यांनी व्यक्त केले.हा कार्यक्रम हॉटेल विघ्नहर्ता येथे मोठया थाटात संपन्न झाला काव्यवाचना नंतर स्नेहभोजन झाले. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे पंचायत समिती सदस्य माऊली सानप, आम आदमी पार्टी चे अशोक येडे, मनसे नेते शिवराज बांगर, बी एस पी चे प्रशांत वासनिक,वंचित चे बबन वडमारे,एम आय एम शफीक भाऊ शेख, संपादिका अनुप्रीया मोरे, प्रा लांडगे,आप चे ज्ञानेश्वर राउत, लोकपत्रकार अशोक तावरे, गुरुवर्य डॉ.दत्तात्रय जवारे,मार्गदर्शक डॉ आळणे, वकील संघाचे शशिकांत सावंत, स्टार कोंडिराम वाघमोडे, प्रा. साळवे, अधिकारी महादेव महाकुडे, शिक्षक प्रमोद वंजारे, पो.सणी वंजारे,उद्योजक गंगाराम महाकुडे, शाम साळवे, इंजीनीअर भगवान दीपके, विलास दीपके, भाऊसाहेब औसरमल,गोरख वंजारे इत्यादि सह अनेक जन उपस्थित होते.

Show More

Related Articles

Back to top button