पोलिस वार्तावर्तमान महाराष्ट्र

मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या बालाजी गुट्टे यास कडक शासन करा : नुमान चाऊस

माननीय उपविभागीय अधिकारी मॅडम नीलम बाफना यांना व शहर पोलीस स्टेशन, माजलगाव येथे निवेदने

निवेदन

भारतात ईशनिंदा प्रतिबंधक कायदा करावा – मौलाना आझाद युवा मंच

प्रतिनिधी,
सदरील बातमी अशी की बीड जिल्ह्यातील परळी शहर येथे बालाजी गुट्टे नावाच्या एका इसमाने फेसबुक या सोशल मीडिया प्लैटफॉर्म वरती अल्लाह(ईश्वर) विषयी अपशब्द वापरले, ईश्वर निंदा केली. त्या विरोधात लोकांमध्ये खूप नाराजी आहे. त्या इसमाला पोलिसांनी अटक केली असून गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे. परंतु भविष्यात कोणीही असे कृत्य करू नये जेणेकरून कोणत्याही समाजाचे धार्मिक भावना दुखावतील किंवा दोन समाजात तेढ निर्माण होईल, दोन समाजात द्वेष निर्माण होईल व असे कृत्य करण्याच्या तयारीत असलेल्या किंवा मानसिकता असलेल्या लोकांना सुद्धा अद्दल घडावी म्हणून त्या इसमावर कठोर व कडक कायदेशीर कारवाई करावी, दाखल झालेल्या एफआयआरमध्ये भारतीय दंड संहिता (आयपीसी) आयटी अॅक्टच्या अजून कलमे लावून त्याची सहजरित्या सुटका होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने पाऊल उचलावे, भारतात ईशनिंदा प्रतिबंधक कायदा करावा या मागण्यांसाठी मौलाना आझाद युवा मंचच्या वतीने तहसील कार्यालय माजलगाव, माननीय उपविभागीय अधिकारी मॅडम नीलम बाफना यांना व शहर पोलीस स्टेशन, माजलगाव येथे निवेदने देण्यात आली. यावेळी मौलाना आझाद युवा मंच चे जिल्हा अध्यक्ष नुमान अली चाऊस, एडवोकेट शेख खालील अहमद साहब, एडवोकेट इनामदार वसिउद्दीन, शेख माहदी हसन व इतर नागरिक उपस्थित होते.

प्रति,
मा. संपादक साहेब,
वर्तमान महाराष्ट्र
आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रात बातमी प्रसिद्धीस दयावी ही विनंती.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button