पुणे विशेषसंपादकीय

लोकहिताचे कायदे आणि सर्वसामान्यांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली तरच देशाचे स्वातंत्र्य आनंदाने उपभोक्ता येईल – उमेश चव्हाण

अजूनही देशातील दारिद्र्य, बेरोजगारी, शिक्षणाचे अल्प प्रमाण, गरिबांना दर्जेदार उपचार मिळू नये म्हणून झटणारी विशिष्ट यंत्र

पुणे – आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली. आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय तरीही आपले हक्क मागायला गेलो तर आपल्याला नागरिक म्हणून नाही तर भिकाऱ्यासारखी अपमानास्पद वागणूक दिली जाते. ज्याच्या खिशात पैसे आहेत त्यालाच दर्जेदार उपचार मिळतात. गरीब असेल त्याला चांगले आरोग्य, उपचार, शिक्षण आणि न्यायापासूनही वंचित रहावे लागत आहे. स्वातंत्र्य असूनही दरवेळी लढावे लागत आहे. झगडावे लागत आहे. राजकारण्यांना जर खरोखरच सत्तेचा मोह नसेल, खरोखरच लोकांच्या हितासाठी सत्तेच्या खुर्चीवर आले असतील तर त्यांनी भारतीय संविधानात नमूद असणारे लोकहिताचे कायदे आणि योजना जर प्रभावीपणे राबवल्या तरच अमृत महोत्सव साजरा करण्याला अर्थ आहे. असे मत रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी व्यक्त केले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही रुग्ण हक्क परिषद मुख्यालयामध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे शहर अध्यक्ष अपर्णा साठ्ये, संजय कुरकुटे, श्रीनिवास कुलकर्णी, राज्य सरचिटणीस संध्याराणी निकाळजे, नीता जगताप, विकास साठ्ये आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
उमेश चव्हाण पुढे म्हणाले की, अजूनही देशातील दारिद्र्य, बेरोजगारी, शिक्षणाचे अल्प प्रमाण, गरिबांना दर्जेदार उपचार मिळू नये म्हणून झटणारी विशिष्ट यंत्रणा, पुन्हा शिक्षणाचा खालावत असलेला स्तर देशाला प्रगती कडे नाही तर अधोगतीकडे घेऊन जाणार आहे. भारतीय संविधानाची प्रभावी अंमलबजावणी करणारे शासनकर्ते आणि प्रामाणिक प्रशासकीय व्यवस्था निर्माण करण्यासाठी लोकांचा लोकशाहीचा कायदेशीर दबाव गट निर्माण होणे गरजेचे आहे. लोक जागृत झाल्याशिवाय त्यांना स्वातंत्र्याचा आनंद उपभोगता येणार नाही, असेही परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण म्हणाले.

Show More

Related Articles

Back to top button