लोक प्रेरणावर्तमान महाराष्ट्र

गुजरवाडी येथील मृत बाबुराव नरवडे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत

माजलगाव / ( वर्तमान महाराष्ट्र )
काही दिवसांपूर्वी तालुक्यातील गुजरवाडी येथील बाबुराव नरवडे हे नदी ओलांडत असताना नदीवर पुल नसल्यामुळे व पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पुराच्या पाण्यात वाहून गेले होते. आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर माजलगाव तहसीलदार वर्षा मनाळे यांनी मृत बाबुराव नरवडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले होते. व आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्या सूचने नुसार सर्वतोपरी शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पुर्तता म्हणून आणि आज दि. २२ जुलै रोजी कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून उपविभागीय अधिकारी बाफना मॅडम आणि माजलगाव तहसीलदार वर्षा मनाळे मॅडम यांनी गुजरवाडी येथे जावून मृत व्यक्तीच्या कुटुंबियांकडे चार लाख रूपयांचा धनादेश सुपुर्द केला. याप्रसंगी पात्रुड सज्जाचे तलाठी संघर्ष ओवे साहेब, एकनाथ मस्के, अरूण जोगदंड, पापा घाडगे, संभाजी पवार, कल्याण पवार, बालासाहेब येवले, शंकर शेंडगे, अंबादास नावडकर व गुजरवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button