शैक्षणिकसंपादकीय

ईगलवूड इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी वारी संपन्न

ईगलवूड इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी वारी संपन्न

माजलगाव / ( वर्तमान महाराष्ट्र )
फुले पिंपळगाव येथील ईगलवूड इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त पायी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी शाळेतील मुले – मुली विठ्ठल रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम, त्याचप्रमाणे वारकरी, संत अशा वेगवेगळ्या वेशभूषेत डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन, टाळ – मृदंगाचा जयघोष करत पायी दिंडीत सहभागी झाले होते. ज्ञानोबा माऊली तुकाराम म्हणत विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षक-शिक्षिका सोबत दिंडीत सहभागी होऊन आषाढी एकादशी चे महत्व शालेय परिसरातील लोकांना पटवून दिले. शाळेमध्ये दिंडीतून आल्यानंतर विद्यार्थ्यांनी गोल रिंगण करून त्यामध्ये अभंग, भजन, भारुड, गवळणी सादर करून फुगडी खेळली. कार्यक्रमाची सांगता महाआरतीने झाली. या सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून डॉ.सुशील लोढा हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सुनंदा पवार, डॉ.अर्चना पवार , सौ.रेणुका लोढा व पार्थ लोढा हे होते. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी प्राचार्य आनंद मरळगोईकर व उपप्राचार्य मनीषा होळकर यांनी परिश्रम घेतले.

Show More

Related Articles

Back to top button