आपला जिल्हाग्रामीण वार्ता

आषाढी एकदशीनिमित्त स्वानंदी परिवाराकडून ‘अभंगवाणी’ कार्यक्रम संपन्न

माजलगाव / ( वर्तमान महाराष्ट्र )

विश्वनियंता विठ्ठलाच्या चैतन्याने अणू रेणू सजीव झाल्याचा अमृतानुभव एकादशीस सर्वांनी घेतला. त्यातीलच एक माजलगाव येथील स्वानंदी परिवाराच्या सूरजन समुहाचा प्रयत्न
दि.१० जुलै रोजी आषाढी एकादशीच्या निमित्ताने सुरजन समूहाच्या वतीने ‘अभंगवाणी ‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लहानशा विद्यार्थ्यांची साथ संगत, अभंग पुस्तिका, उत्तम निवेदन, १०० च्या वर श्रोतावर्ग, पांडुरंग- रखुमाईची रांगोळी, २० ते २२ जणांचे सादरीकरण, सफेद वेश, ३.३० तासाची बैठक देणारा श्रोता हे या कार्यक्रमाचे वेगळेपण होते.
या कार्यक्रमात एकूण २२ अभंग सादर झाले. यात मोगरा फुलला, कानडा राजा पंढरीचा, अबीर गुलाल, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, खेळ मांडीयेला, घनू वाजे घुणघुणा अशा अनेक अभंगांचे सादरीकरण झाले. यावेळी सर्व शिकाऊ विद्यार्थ्यांनी साजेशी अशी तबला साथ केली व एकूणच पखवाज साथ ॲड.राम देशपांडे यांनी केली. तर संवादिनी साथ संजय कुलकर्णी, प्राणेश पोरे व कुणाल कुलकर्णी यांनी केली.
या ‘अभंगवाणी’ ची सुरुवात ॲड.राम देशपांडे आणि प्रशांत भानप यांनी श्री विठ्ठलाच्या पूजनाने केली. यानंतर सर्व अभंगांच्या प्रतीचे विमोचन जगदीश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सांप्रदायिक पद्धतीने या ‘अभंगवाणी’ कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन अन्वी जाधव हिने अतिशय सुरेल केले.
या कार्यक्रमासाठी रसिक श्रोत्यांची उपस्थिती १०५ होती. यावेळी स्मिता लिंबगावकर, सौ. निळेकर, पूजा देशमुख, अनघा देशमुख, सौ.ठोंगे, अंकुश साबळे, राजाभाऊ शेळके, डॉ.निळेकर, किशोर कुलकर्णी, सुरेश भानप, विकास जाधव आदी रसिक श्रोते उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button