अवर्गीकृत

गुजरवाडी येथे नदीला आलेल्या पुराच्या प्रवाहात वाहून गेल्यामुळे बाबुराव नरवडे यांचा मृत्यू पात्रुड येथे पुलाखाली प्रेत आढळले

बाबुराव नरवडे

गुजरवाडी येथे नदीला आलेल्या पुराच्या प्रवाहात वाहून गेल्यामुळे बाबुराव नरवडे यांचा मृत्यू पात्रुड येथे पुलाखाली प्रेत आढळले

आमदार व प्रशासनाबद्दल येथील रहिवाशा मधून संताप व्यक्त केला जात आहे

माजलगाव / ( पृथ्वीराज निर्मळ )
तालुक्यातील गुजरवाडी हे गाव पात्रुड सर्कलमध्ये येत असून या गावची लोकसंख्या साधारणता 800 एवढी आहे. व एकूण मतदार साधारणतः 450 या गावातील शाळेमध्ये जाण्यासाठी विद्यार्थी संख्या देखील लक्षणीय आहे. परंतु या गावांमध्ये येथील गावकऱ्यांना येण्या जाण्यासाठी नदीवर पूल नसल्यामुळे या गावातील शेतकरी शाळकरी मुलांचे खूप मोठ्या प्रमाणात हाल होत असून. हा पूल गुजरवाडीकरांचा मुख्य रस्ता असून या पुलावरून गुजरवाडी, शेंडगे वस्ती, काळे वस्ती, नाकलगाव येथील रहिवाशांसाठी मुख्य रस्ता मानला जातो परंतु याकडे प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष झालेले आहे. यातच काल दुपारी चार वाजता झालेल्या पावसामध्ये येथील नदीला पूर आला. व या पुरामध्ये गुजरवाडी येथील बाबुराव रामकिसन नरवडे वय वर्ष 68 हे खचलेल्या पुलावरून गावाकडे जात असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते पाण्यात पडून पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेल्यामुळे पात्रुड येथील लोणगाव नदीवरील पुलाखाली त्यांचा मृतदेह आढळून आला असून. येथील ग्रामस्थांनी आमदार व प्रशासन यांच्या विषयी संताप व्यक्त केला आहे. पाच ते सहा वर्ष पासून येथील पुला विषयी माजलगाव आमदार, जिल्हाधिकारी, माजलगाव तहसीलदार तसेच बांधकाम विभाग यांना याबाबत रीतसर तक्रारी करून देखील लोकप्रतिनिधी व स्थानिक प्रशासनाने या गोष्टीकडे त्यांनी दुर्लक्ष केले व मंजूर झालेला पुलाचे काम अपूर्ण राहिले असून. वेळीच हा पूल झाला असता व आमदार व प्रशासनाने लक्ष दिले असते तर आज ही घटना घडली नसती.
गुजरवाडी येथील बाबुराव रामकिसन नरवडे यांचा नदीवर पूल नसल्यामुळे व पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते पाण्यात पडून वाहत जाऊन त्यांचा मृत्यू झाला. असे येथील जनतेमधून बोललेले जात असून या प्रकरणामुळे गावावर शोककळा पसरली असून येथील रहिवाशात मध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button