शेती विषयकसंपादकीय

स्वाभिमानी शेतकरी संघटना केज च्या वतीने औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलनाला यश!

स्वाभिमानी शेतकरी संघटना केज च्या वतीने औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयावर ..

बीड प्रतिनिधि / महाराष्ट्र जमीन महसूल अधिनयम1960 कलम 155 अन्वये मौजे उमरी ता. केज जि. बीड येथील सर्वे नंबर 79/1मधिल क्षेत्र दुरुस्ती प्रकरणात एकतर्फी निर्णय देणारे नायब तहसीलदार सचिन देशपांडे यांची 15 दिवसात चौकशी करून कारवाईचा अहवाल सादर करण्याचे मा. विभागीय आयुक्त औरंगाबाद कार्यालयाचे आदेश!!
अनेक वर्षांपासून केज तहसील कार्यालयात ठाण मांडून बसलेले नायब तहसिलदार श्री. सचिन देशपांडे विरोधात शेतकऱ्यांच्या अनेकदा तक्रारी प्राप्त होत्या ,गोर गरीब शेतकऱ्यांचे क्षेत्र दुरुस्ती, रस्ते आदी अर्धन्यायिक प्रकरणात पैसे घेऊन निर्णय देणे ,हेकेखोरपणा करून सामान्य जनतेची प्रशासकीय हेळसांड करणे ,राजकीय पुढाऱ्यांच्या आश्रयाने प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक तडजोडी करून कामे करणे आदी. गंभीर विषयावर स्वाभिमानी पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत धरणे आंदोलन चालू केले होते.सदर आंदोलनाची दखल घेऊन मा.सुनिल केंद्रेकर विभागीय आयुक्त औरंगाबाद यांनी संबंधित प्रकरणात 15 दिवसात कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.
या आंदोलनाला स्वाभिमानी पक्षाचे औरंगाबाद शहराध्यक्ष अब्दुलभाई रउफ व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

Show More

Related Articles

Back to top button