लोक प्रेरणाशैक्षणिक

नवचेतना इंटरनॅशनल इंग्लिश स्कुलमध्ये विध्यार्थांचे जल्लोषात स्वागत !

नवचेतना इंटरनॅशनल इंग्लिश स्कुलमध्ये विध्यार्थांचे जल्लोषात स्वागत !

केज येथील निसर्गरम्य वातावरणात उभे असलेल्या नवचेतना इंटरनॅशनल इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांचा वेलकम( सुस्वागतम) कार्यक्रम प्रवेशाच्या वेळी करण्यात आला संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष सौ, मनिषा घुले यांनी सांगितले कि गरीबातील गरीब विद्यार्थी इंग्लिश शिक्षणापासून वंचित राहिला नाही पाहिजे ज्या गरीब पालकांची इच्छा असूनही परिस्थितीमुळे इंग्लिश स्कूलला प्रवेश घेऊ शकत नाहीत अशांचा पाल्यांना २५-३०, विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देवून एक समाजापुढे एक वेगळाआदर्श निर्माण केला आहे .
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षापासून शाळा बंद असल्याने, विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत होते. परंतु यावर्षी प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या असून, पहिल्याच दिवशी उपस्थित विद्यार्थ्यांचे शाळेत जल्लोषात स्वागत करण्यात आले .विद्यार्थ्यांचा किलबिलाट आणि गर्दीने नवचेतना इंटरनॅशनल इंग्लिश स्कुल अगदीच फुलून आल्याचे दिसून आले.


गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने राज्यातल्या आणि विशेषतः बीड जिल्ह्यातल्या सर्वच शाळा बंद होत्या. शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थी आहे त्या सुविधेसह ऑनलाईन शिक्षण घेत होते. मुलांना ऑनलाइन शिक्षण मिळाले. परंतु त्यांचे खेळणे, बागडणे आणि एकमेकांशी प्रत्यक्ष भेटून शालेय शिक्षण घेणे बंद असल्याने विद्यार्थी हिरमुसले होते. परंतु या वर्षा पासून राज्यातल्या सर्वच शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्या आहेत. केज येथील सर्व शाळाही सुरू झाल्याने पहिल्याच दिवशी प्रत्येक शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले.


यावेळी बऱ्याच दिवसांनी भेटलेले मित्र-मैत्रिणी यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. त्यासोबतच दोन वर्षापासून प्रत्यक्ष एकमेकांपासून दूर असलेले शिक्षक व विद्यार्थी एकत्र आल्याने आणि विद्यार्थ्यांच्या गर्दी आणि किलबिलाटाने संपूर्ण परिसर फुलल्याचे दिसून येत होते तर शिक्षकांना मनापासून आनंद आणि समाधान वाटत होते, आता गेल्या दोन वर्षाचा विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष शिक्षण घेण्याचा शैक्षणिक बॅकलॉग कोणत्याही स्थितीत भरून काढायचा आणि विद्यार्थ्यांचा बेसिक अभ्यास उत्तम पद्धतीने तयार करून घेण्याचा चंगही शिक्षकांनी बांधल्याचे शाळेचे मुख्याध्यापक यांनी बोलून दाखवले. विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी करण्यात येणाऱ्या काळात सर्व उपाय योजना चे नियोजनही करण्यात असल्याचे त्यांनी सांगितले.

नवचेतना इंटरनॅशनल इंग्लिश स्कुलमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ, खाऊ, चॉकलेट वाटप करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरही आनंद ओसंडून वाहत होता.या वेळी शाळेला भेट देणाऱ्या मान्यवरांचा शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला यावेळी इंग्लिश स्कुलचे सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी, झुंजार पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष दशरथ चवरे , पत्रकार नंदकुमार मोरे, पत्रकार महादेव दळवे, पुरोगामी पत्रकार संघाचे अध्यक्ष, रंजीत घाडगे, पत्रकार अनिल वैरागे, पुरोगामी पत्रकार संघाचे बीड जिल्हा सचिव धिवार राजकुमार नवचेतना सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा, सौ, मनिषा घुले, संस्थेचे सीझ महादेव जोगदंड व सदस्य , पालक वर्ग इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button