अवर्गीकृत

शेतकरी बांधवांची बियाणे व खतामधील लूट थांबवा! राज्य व केंद्रीय कृषी मंत्री यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी- सुनील ठोसर

शेतकरी बांधवांची बियाणे व खतामधील लूट थांबवा! राज्य व केंद्रीय कृषी मंत्री यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी- सुनील ठोसर

माजलगाव ( पृथ्वीराज निर्मळ )
सध्या खरीप हंगाम जवळ आला आहे त्यामुळे शेतकरी खते आणि बियाणे खरेदी करण्याच्या मार्गावर आहे. तर या हंगामात शेतकऱ्यांची आर्थिक खूप लूट होतआहे यामुळे रयत शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुनिल ठोसर यांनी दि. २५ मे रोजी केंद्रीय कृषी डॉ. मा. भारती पवार व राज्याचे कृषी मंत्री मा. दादाजी भुसे साहेब यांचेकडे निवेदन दिले आहे. आणि या मागणीची तत्काळ बैठक घेऊन राज्यातील सर्व आयुक्त, कुलगुरू, कृषीचे सर्व संचालक, सर्वच जिल्हाधिकारी, कृषी सभापती, जिल्हा कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी सर्वच, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी आदी कृषी विभागातील सर्व प्रशासकीय विभाग यांना तातडीचे आदेश देऊन शेतकऱ्यांची कुठेही फसवणूक होताना तक्रारी आल्या तर तत्काळ कार्यवाही करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे. हलगर्जी करणाऱ्या अधिकारी यांचेवर सुद्धा कठोर कार्यवाही करण्यात येणार आहे शेतकरी बांधवांनी कंपन्या, अधिकारी, विक्रेता यांच्या तक्रारी कृषी विभागाला देण्यात याव्यात कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. चढत्या दराने बियाणे व खतांची विक्री केली तर त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी जाहीर केले आहे. तर आर्थिक लूट थांबविण्यासाठी प्रदेश सरचिटणीस सुनिल ठोसर यांनी पाठपुरावा केला आणि या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. या यशामुळे शेतकरी वर्गातून ठोसर यांचे कौतुक करून अभिनंदन केले जात आहे. आणि सुनिल ठोसर यांनी शेतकऱ्यांना असे अवहान केले आहे की कुणीही चढत्या दराने बियाणे व खतांची विक्री केली तर माझ्याशी व रयत शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांचेशी संपर्क साधावा ९४०५७९९९९९ राज्यामध्ये देशी कपाशीचे देशी वाण होते नंतर घयाबिट बियाणे आले आणि मग विदेशामध्ये विदेशी कंपनी माॅन्सेन्टो ने कपाशी बियाण्यामध्ये संशोधन करून जिन कपाशीच्या बियाण्यामध्ये जेनेटिक प्रत्यरोग केले आहे.
सविस्तर असे की, महाराष्ट्रातील सर्व कृषी कार्यालय येथे स्टॉक व दर पत्रक लावून कृषी ऑफिस मार्फत शेतकऱ्यांना बियाणे व खते देण्यात यावे तसेच सर्व कंपनीचे बियाणे उगवण क्षमता तपासूनच विक्रीसाठी परवानगी देण्यात यावी व बोगस आढळणाऱ्या कंपनीचे उत्पादन महाराष्ट्र बंद करून शेतकऱ्यांना हेक्टरी २ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे करार पत्रक करून बियाणे देण्यात यावे कृषीचे अतिरिक्त दराने बियाणे विकणाऱ्या दुकानाचे लायसन्स रद्द करून योग्य ती कारवाई करावी. अशी मागणी रयत शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुनिल ठोसर व पदाधिकारी यांच्या वतीने निवेदन देऊन तात्काळ कारवाई न झाल्यास राज्यभरात रयत शेतकरी संघटना उग्र अशा स्वरूपात आंदोलन करेल व याची सर्वस्वी जबाबदारी राज्यातील कृषी प्रशासनावर राहिल असे निवेदनाद्वारे इशारा सुनील ठोसर यांनी सांगितले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button