पोलिस वार्तावर्तमान महाराष्ट्रसंपादकीय

बलात्कार करणाऱ्या नराधमांना अटक करुन फाशीची शिक्षा द्यावी;- राष्ट्रीय चर्मकार महासंघाची मागणी

राष्ट्रीय चर्मकार महासंघ

बलात्कार करणाऱ्या नराधमांना अटक करुन फाशीची शिक्षा द्यावी;- राष्ट्रीय चर्मकार महासंघाची मागणी.

माजलगाव / ( पृथ्वीराज निर्मळ )

दि. १४ मे २०२२ रोजी कळमसरा ता. पाचोरा जि.जळगाव येथील १३ वर्षीय अल्पवयीन दलित चर्मकार समाजातील मुलीला सात ते आठ नराधम उचलून घेऊन गेले व तिच्यावर सामूहिक बलात्कार करून अत्याचार केल्याची निंदनीय घटना दि. १४ मे २०२२ रोजी उघडकीस आली .दि. १३ मे २०२२ रोजी सदर मुलगी आपल्या मैत्रिणीसोबत रात्री नऊ वाजता घरासमोर बोलत उभी होती. त्यानंतर ती गायब झाली व तिच्यावर सात ते आठ जणांनी सामूहिक रित्या बलात्कार व अत्याचार केला.

मग तिला पहाटे तीन वाजता महिलांच्या सार्वजनीक शौचालयाचे जवळ सोडून पळून गेले . तेथे सोडून दिल्यावर मुलगी आपल्या घरी आली. सदर घडलेल्या घटनेची माहिती तिने आपल्या आई-वडिलांना सांगितली . ही घटना अतिशय धक्कादायक माणुसकीला काळीमा फासणारी व दुर्दैवी आहे. पोलिसांनी काही आरोपींना अटक केली आहे. या प्रकारच्या घटना महाराष्ट्रात वारंवार घडत आहेत हे अतिशय क्लेशदायक व निंदनीय आहे .राष्ट्रीय चर्मकार महासंघ आता गप्प बसणार नाही याची नोंद शासन व संबंधित पोलीस ठाणे यांनी घ्यावी. राष्ट्रीय चर्मकार महासंघ या घटनेचा तीव्र निषेध करीत आहेत.

सर्व आरोपींना त्वरित अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात घेऊन आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी पीडित मुलीला व तिच्या कुटुंबियांना योग्य तो न्याय मिळावा अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघ बीड जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे

यासंबंधीचे निवेदन माजलगाव उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दि. २४ रोजी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष नाना साहेब घोडके, युवा मराठवाडा अध्यक्ष अॕड. गणेश गवळी, युवा जिल्हाध्यक्ष राजेश जाधव, कर्मचारी जिल्हाध्यक्ष अशोक वाडेकर जिल्हा संपर्कप्रमुख रमेश जगताप, जिल्हा संघटक राधाकिसन भाळशंकर, माजी उपनगराध्यक्ष सुनील खंडागळे, तालुका अध्यक्ष सुभाष कांबळे, ज्येष्ठ नेते विष्णू गवळी, बंडू सोनवळे, सचिन वाघमारे, बजरंग खरात, बंडू सोनवणे, भागवत जाधव, मुरलीधर घोडके, गजानन वाघमारे, संतोष खंडागळे, श्रीहरी सोनवणे यांनी निवेदन दिले आहे

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button