राजकीय क्षेत्रसंपादकीय

डॉ. वसीम मनसबदार यांच्या नेतृत्वाखाली पात्रुड सेवा सहकारी सोसायटी राष्ट्रवादी पक्षाच्या ताब्यात.

डॉ. वसीम मनसबदार यांच्या नेतृत्वाखाली
पात्रुड सेवा सहकारी सोसायटी राष्ट्रवादी पक्षाच्या ताब्यात.
——————————————–
माजलगाव / ( पृथ्वीराज निर्मळ )
माजलगाव पंचायत समिती सभापती डॉक्टर वसीम भैया मनसबदार यांच्या कुशल नेतृत्वाखाली पाञुड सेवा सहकारी सोसायटी निवडणूक ही बिनविरोध झालेली असून. मा. आमदार प्रकाश दादा सोळंके यांचे खंदे समर्थक, तरुण तडफदार, कुशल नेतृत्व व पाञुड येथील राजकारणामध्ये उभरते नेतृत्व सर्वसामान्याच्या प्रश्नांची जाण असणारे व सर्व सामान्य जनतेशी नाळ जोडलेले वसीम भैया मनसबदार यांच्यावरती मा. आमदार प्रकाश दादा सोळंके यांनी विश्वास टाकून येथील सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीची पूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर ती दिलेली होती. आणि त्यांनी यामध्ये विरोधकांच्या चारीमुंड्या चीत करत  पात्रुड सेवा सहकारी सोसायटी बिनविरोध करत डॉ. वसीम भैय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात मिळवून दिली आहे.
सर्व सदस्यांचा सत्कार करताना माजलगाव मतदार संघाचे आमदार प्रकाश दादा सोळंके साहेब, सुंदरराव सहकारी कारखान्याचे चेअरमन धैर्यशिल काका, उपसभापती डॉ. वसिम भैय्या मनसबदार, माजी उपसरपंच अजिम भैय्या मनसबदार, माजी सरपंच जब्बार भाई, माजी उपसरपंच घनश्याम दादा, माजी सरपंच नजीर भाई, माजी उपसभापती लतीफ भाई, माजी सरपंच एकनाथ मस्के यांनी सर्वांचे अभिनंदन केले. सदस्य -कापसे सुधाकर, शिंदे बाबासाहेब , संतोष घुबडे, शेख वहीद, सय्यद नुर पटेल, धुमाळ बाळु, शेख सलीम, शेख रशिद, ढगे गणपत, माने भारत, मोमिन अनिस, सिद्दिकी वसिम, काळे सुधाकर

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button