वर्तमान महाराष्ट्रसंपादकीय

मोफत च्या रेशन पासून गोरगरीब जनतेला ठेवले वंचित स्वस्त धान्य दुकानदार तुपाशी जनता मात्र उपाशी

मोफत च्या रेशन पासून गोरगरीब जनतेला ठेवले वंचित स्वस्त धान्य दुकानदार तुपाशी जनता मात्र उपाशी

जिल्हा पुरवठा अधिकारी व तहसीलदार यामध्ये लक्ष घालेल का?

माजलगाव / पृथ्वीराज निर्मळ
तालुक्यातील पात्रुड येथील राशन दुकानदार यांनी शासनाच्या दिल्या जाणाऱ्या गोरगरीब जनतेसाठी मोफत राशन वाटप योजनेचा लाभ येथील राशन दुकानदार गोरगरीब जनतेस देत नसून गोरगरीब जनता एप्रिल महिन्याचे मोफत राशन वाटप अद्याप मिळाले नसल्यामुळे मोफत राशन च्या प्रतीक्षेत उपाशीपोटी त्रस्त आहे.
सर्वसामान्यांच्या व गोरगरीबांच्या हक्काच्या मोफत राशन पासून गोरगरीब जनता वंचित राहिलेली असून अद्याप पर्यंत गेल्या एप्रिल महिन्यांमधील मोफत दिले जाणारे राशन धान्य आणखी स्वस्त धान्य दुकानदारांनी वाटप केले नसून सर्वसामान्य गोरगरीब जनता मोफत मिळणाऱ्या धान्याच्या प्रतीक्षेत त्रस्त झालेली असून आज पर्यंत एप्रिल महिन्याचे मोफत धान्य मिळाले नसल्यामुळे उपाशीपोटी राहण्याची वेळ गोरगरीब जनतेवर आलेली आहे. स्वस्त धान्य दुकानदार तुपाशी जनता मात्र उपाशी अशी वेळ येथील जनतेवर आलेली आहे. शासनाकडून मोफत राशन घोषणा होतात ते दिलेही जाते मात्र हेच हक्काचे राशन कधीच वेळेवर जनतेपर्यंत पोहोचत नसल्यामुळे गोरगरीब व सामान्य नागरिकांवर उपासमारीची वेळ येत आहे. मोफत ची राशन मिळण्यासाठी राशन दुकानदारांच्या दुकानावर अनेक दिवस चकरा माराव्या लागत असून राशन दुकानदारांना याची विचारणा केली असता ते देखील समाधानकारक उत्तरे देत नाहीत. ते सांगतात की मोफत चे राशन आणखी आलेले नाही आल्या नंतर सांगू नसता तुम्ही तहसील ला जाऊन चौकशी करा. रोज तुम्हाला सांगण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही. अशा दुकानदारांच्या वर्तणुकीमुळे व दररोज राशन दुकानावर चकरा मारून गोरगरीब जनतेची पिळवणूक होत असून त्यांना फार मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या सर्व गोष्टीकडे मा. जिल्हा पुरवठा अधिकारी साहेब तसेच मा. तहसीलदार साहेब हे लक्ष देतील का? गोरगरीब जनता मोफत मिळणाऱ्या राशनच्या लाभापासून वंचित राहणार नाही यासाठी प्रयत्न करतील का? व जनतेच्या हक्काचे राशन लवकरात लवकर मिळेल व गोरगरीब जनता हक्काच्या राशन पासून उपाशीपोटी राहणार नाही याची तरतूद करतील का? असा सवाल गोरगरीब सामान्य जनतेतून बोलला जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button