पोलिस वार्तासंपादकीय

सोमठाणा जयंती मध्ये हल्ला करणाऱ्या गावगुंडांना अटक करा तळपत्या उन्हात ग्रामस्थांचा आक्रोश 

सोमठाणा जयंती मध्ये हल्ला करणाऱ्या गावगुंडांना अटक करा तळपत्या उन्हात ग्रामस्थांचा आक्रोश 

माजलगाव : ( पृथ्वीराज निर्मळ )

माजलगाव तालुक्यातील मौजे सोमठाणा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मिरवणुकीत भ्याड हल्ला केल्याची घटना दि.२९ एप्रिल रोजी घडली या हल्ल्यात तिघांना मार लागला होता या घटनेतील सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी संतप्त ग्रामस्थ यांचे कडून सतत केली जात आहे. तरी यादरम्यान पोलीस प्रशासनाने कसलिही कारवाई केलेली दिसत नाही. यामध्ये प्रशासनाचा निष्काळजीपणा समोर येत आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या २९ एप्रिल रोजी जयंतीच्या मिरवणूकी मध्ये भ्याड हल्ला करणार्‍यांवर ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. जयंती हल्ल्यातील फिर्यादी म्हणून राज रतन किसन भालेराव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला होता आरोपींना अटक न केल्यामुळे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष विजय दादा साळवे वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याचे नेते धम्मानंद भाऊ साळवे यांच्या नेतृत्वाखाली तळपत्या उन्हात आक्रोश करीत जयंतीच्या मिरवणुकिवर हल्ला करणाऱ्या व कार्यकर्त्यांना जखमी करणाऱ्या गावगुंडांना अटक करा घोषणा देत मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की गेल्या काही दिवसांमध्ये बीड जिल्ह्यात बौद्ध व दलित समाजावर अन्याय अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे त्या मध्येच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मिरवणुकीवर हल्ला करून बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणाऱ्या व जयंती मध्ये सामील झालेल्या कार्यकर्त्यांना जखमी करणाऱ्या गाव गुंडांना अटक करण्यात यावी व बीड जिल्ह्यातील बौद्धा सह दलितांवर होणारे अन्याय अत्याचार होत आहेत ते गुन्हेगारांना अटक करून थांबवावी अशी मागणीही या लोकांनी दिली आहे. या आंदोलनामध्ये स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठवाडा प्रदेशाध्यक्ष विजय दादा साळवे, वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा नेते धम्मानंद भाऊ साळवे, बसपाचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट अमोल डोंगरे, एस एन डोंगरे , प्रशांत बोराडे, डी.एल.भालेराव, विशाल साळवे, अतुल भदर्गे, वशिष्ठ लांडगे यांच्यासह सोमठाणा गावातील महिला पुरुष अन्याय पीडित ग्रामस्थ व इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button