देश-विदेशलोक प्रेरणा

भारताच्या विभाजनाला धर्मवाद हेच मुख्य कारण.धर्मवादाने देशाचे आणखी तुकडे होतील – डॉ.जितीन वंजारे

भारताच्या विभाजनाला धर्मवाद हेच मुख्य कारण.धर्मवादाने देशाचे आणखी तुकडे होतील – डॉ.जितीन वंजारे

 

भारतात सर्वधर्म समभाव आहे असं आपण फक्त म्हणतो पण आजकाल त्याला फाटा देत हिंदू राष्ट्र बनवण्यामागे काही सत्ताधारी भगव्याधरी लागले आहेत.त्यांना भारताची आजपर्यंतची झालेली विभागणी कदाचित माहिती नसावी अश्या विक्षिप्त भावनेने बोलण्याने देशाचे आणखी तुकडे होऊ शकतात याची त्यांना जाणीव नाही कारण आजपर्यंत आपल्या भारत मातेचे सात वेळा विभाजन झाले.आपला देश नव्हे तर आपली भारत माता पूर्वी हिमालयापासून हिंदी महासागरा पर्यंत आणी इराण पासून इनडोनेशिया पर्यंत विस्तारलेला होता.1857 साली भारताचे एकूण क्षेत्रफळ 83 लाख चौरस किलोमीटर होते तेच आजच्या परिस्थिती ला 33 लाख चौरस किलोमीटर आहे.हा भूखंड म्हणजे सर्व धर्म समभाव जपणारा आणी बलशाली होता पण परकीय आक्रमनामुळे आपल्यात भांडण लावून आजपर्यंत सात वेळा या भारत मातेचे तुकडे केले आणी धर्मवादाने अखंड भारताचे तुकडे झाले हा इतिहास आहे.सगळ्यात अगोदर 1876 साली अफगाणिस्तान बाजूला झाला,नंतर 1904 साली नेपाळ बाहेर पडला,नंतर 1906 साली भूतान बाहेर पडला,नंतर 1907 साली तीबेट ,1937 साली म्यानमार (बरमा) आणी शेवटी 1947 साली पाकिस्तान बाहेर पडला हे सगळं त्या परकीय लोकांनी म्हणजेच इंग्रजानी घडवल ज्यांची नीती होती ” तोडो फोडो,राज्य करो” त्याप्रमाणे त्यांनी अखंड भारताचे तुकडे तुकडे केले आणी आपली लूट करून आपल्याला कमजोर केले. आज त्यांच्याच उरलेल्या औलादी आपली माथी भडकाऊन आपल्यातून अजून भूखंड वजा करण्याचे षडयंत्र रचत आहेत ,स्वातंत्र्य भारताचे हिंदुराष्ट्र बनवणे म्हणजेच भारताचे आणखी तुकडे करण्यासारख आहे यावर युवकांनी अभ्यासक लोकांनी विचार करायला हवा आणी अश्या तोडफोड करणाऱ्या आणी राज्य करू पाहणाऱ्या लोकांना त्यांची जागा दाखवून चिडिचूप केले पाहिजे.नसता हे समाजाला घातक ठरू शकतात असे परखड विचार युवा विचारवंत डॉक्टर जितीनदादा वंजारे यांनी व्यक्त केले.

तोडा फोडा आणी राज्य करा अशी क्लुप्त्ती वापरणाऱ्या आजच्या काही पुढाऱ्याना कोणाला भोंग्याचा त्रास होतो कोणाला कोणाच्या जाती धर्माचा त्रास होतो ,कोणाला जयंती ,वरात ,जागरण गोंधळ ,आरती ,हनुमान चालीसा ,नमाज किंवा मंदिर मस्जिद चा त्रास होतो हे असलं कधी त्रास म्हणून आमच्या मनाला स्पर्श सुद्धा झालं नाही पण वाढलेली महागाई ,वाढलेले पेट्रोल डिझेल चे भाव मात्र मारून टाकण्याइतके वाढले ,तेलाच्या वाढलेल्या किंमती पाहून शारीरातील तेल निघून गेल.नौकरी भरती नाही एकाने भरती काढायची दुसर्याने ती बंद करायची हेच गेल्या दहा पंधरा वर्षांपासून पाहत आहोत याकडे स्वतःला मोठे पुढारी समजणारे कधीही लक्ष देणार नाहीत पण अशांतता ,दंगलखोर आणी चर्चेचे विषय काढून वेळ मारायची आणी आपले पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करायचा अशीच भावना आजकाल च्या सरकार ची दिसून येत आहे.सरकार चालवण कठीण होत आहे जनता प्रत्येक वेळेस धोका खात आहे .यावर कायम उपाय मिळणे शक्य आहे की नाही हे पण सांगणे कठीण झाले आहे कारण कोणाचीच हमी देता येत नाही .स्वार्थ नडतो आहे ज्याचा त्याचा पण माझ् स्पष्ट मत आहे की “ज्या दिवशी आपले मौलिक अधिकार आणी आपली कर्तव्य यासाठी आपण शासन दरबारी धार्मिक वादा सारखे लढू तो दिवस आपल्या देशाचा भाग्योदय असेल असे मी स्वतः मा.सम्राट डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर ठणकाऊन डंके की चोट पे सांगतो.त्यामुळे आपण यात न पडता आता वेळ आली आहे माथी भडकावनाऱ्याचीच माथी फोडन्याची.आता सुज्ञ होऊन आपण असल्या भूल थापाना बळी पडू नका.

जय हिंद जय भीम जय भारत –

 

लेखन :- डॉ. जितीन वंजारे खालापूरीकर

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button