शैक्षणिकसंपादकीय

श्री. श्री. रविशंकर यांच्या जन्मदिनी रक्तदान शिबिराचे आयोजन

श्री. श्री. रविशंकर यांच्या जन्मदिनी रक्तदान शिबिराचे आयोजन

 

माजलगाव (प्रतिनिधी) दि.९ आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार माजलगाव व सिंदफणा शिक्षण प्रसारक मंडळ माजलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आर्ट ऑफ लिव्हिंगचे जागतिक कीर्तीचे अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकरजी यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त दि.१३ मे शुक्रवारी सकाळी ९ वाजता मोरेश्वर विद्यालय शाहूनगर माजलगाव येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री. श्री.रविशंकर हे एक भारतीय आध्यात्मिक गुरू आहेत. त्यांना “श्री. श्री.” किंवा “गुरुजी” या नावांनी ओळखले जाते. त्यांचा जन्म दि. १३ मे १९५६ तामिळनाडू राज्यातील पापणासम येथे झाला.त्यांनी १९८१ मध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेची स्थापना केली. श्री श्री रविशंकरजी यांना जानेवारी २०१६ मध्ये भारत सरकारने “पद्मविभूषण” या पुरस्काराने सन्मानित केले आहे. गुरुदेवांचे कार्य जगभर चालू आहे जगातील 158 देशांमधील 40 कोटी पेक्षा जास्त लोकांनी दिव्य सुदर्शन क्रिया अनुभवली आहे व जगभरातील सर्व लोक गुरु देवांकडे अहिंसावादी नेता शांतिदूत म्हणून संबोधित करत आहेत, वेगवेगळ्या शिबिराच्या माध्यमातून आनंदी जीवन जगण्याची कला संस्थेचे हजारो प्रशिक्षक शिकवत आहेत , प्रेम आनंद ज्ञान ,ध्यान,,आरोग्यदायी जीवन जगण्याचा, शांतीचा साधनेद्वारे संदेश ते संपूर्ण जगामध्ये देण्याचे कार्य करत आहेत. त्यांच्या जन्मदिनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी परिवार जोपासत आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटक माजलगाव तालुक्याचे आ. प्रकाशदादा सोळंके आणि कार्यक्रमाच्या अध्यक्ष दैनिक कार्यरंभचे संपादक शिवाजी रांजवन आहेत. प्रमुख पाहुणे आर्ट ऑफ लिव्हिंगचे मराठवाडा समन्वयक शरद डोल्हारकर, सहसमन्वयक भास्कर मगर आहेत. तसेच विजयकुमार सोळंके, डॉ. एस.टी जुजगर, अँड.भानुदास डक, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुरेंद्र रेदासनी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. रक्तदान शिबिराची नोंदणी करण्यासाठी आर्ट ऑफ लिविंगचे प्रशिक्षक नंदकुमार शिंदे९४२२०६३५३६, रक्तदान शिबिराचे प्रमुख अशोक वाडेकर ९९२१८०९७५४, प्रशिक्षक श्रीकृष्ण शेजुळ९४२२४२४३४४, प्रशिक्षक बाळासाहेब सोनार९४२२४२४३४४, केशव बादाडे ९४०४८८५७८८यांच्या सह अन्यसाधक करत आहेत. तरी माजलगावसह पंचक्रोशीतील रक्तदात्यांनी वरील फोन नंबरवर नोंदणी करून मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे असे आवाहन आर्ट ऑफ लिविंग परिवार व सिंदफणा प्रसारक मंडळ माजलगावचे पदाधिकारी करत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button