बीड जिल्हाराजकीय क्षेत्रसंपादकीय

सिरसाळा येथील पाणी पुरवठा योजनेचे लवकरच भूमिपूजन – ना. धनंजय मुंडे*

  • बुद्धविहारच्या कामासाठी आणखी 50 लाख देण्याची मुंडेंची घोषणा*
  • वांगी येथील नारायण बाबा संस्थांनास ब दर्जा मिळण्यासाठी पाठपुरावा करण्याचे धनंजय मुंडे यांचे आश्वासन
  • परळी तालुक्यातील विविध कार्यक्रमांना ना. मुंडेंची उपस्थीती

परळी / सिरसाळा हे मोठे गाव विस्तारित होत असून, येथे बाजारपेठ, एमआयडीसी यासोबतच विविध विकासकामे देखील पूर्ण करण्यात येत आहेत. सिरसाळा गावच्या पाणी पुरवठा योजनेचे काम देखील हाती घेण्यात येत असून, या कामाचे येत्या काही दिवसातच भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

 

सिरसाळा येथील डॉ. रेहान शेख यांच्या अपेक्स हॉस्पिटलचे आज धनंजय मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

 

सिरसाळा व परिसराने माझ्यावर अतोनात स्नेह व्यक्त केला आहे. या भागातील सर्वांगीण विकासाची व आर्थिक उन्नतीची जबाबदारी आपली असल्याचे सांगतच धनंजय मुंडे यांनी गावातील बौद्ध विहाराच्या कामासाठी मागणीनुसार आणखी 50 लाख रुपये निधी मंजूर करण्याची घोषणा केली. तसेच त्यांनी सिरसाळा येथील बौद्ध विहारातील काम व व्यवस्थेची स्वतः पाहणी केली.

 

कार्यक्रम स्थळी एम टी नाना देशमुख, रा. कॉ. चे तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ, मार्केट कमिटीचे सभापती ऍड. गोविंदराव फड, पंचायत समिती सभापती बालाजी मुंडे, उपसभापती जनिमिया कुरेशी, जि. प. सदस्य प्रा. मधुकर आघाव, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष राजाभाऊ पौळ, बाजार समितीचे संचालक माऊली तात्या गडदे, डॉ. संतोष मुंडे, प. स. सदस्य माऊली मुंडे, नंदागौळचे सरपंच सुंदर गीते, ज्येष्ठ नेते माधवराव नायबळ, वसंतराव राठोड, सिरसाळ्याचे सरपंच राम किरवले, चंद्रकांत कराड, रुस्तुम सलगर, इम्रान पठाण, देवराव काळे, संतोष पांडे, वैजनाथ देशमुख, सुरेश कराड, रवी बडे, भागवत कदम, कैलास जाधव, व्यंकट कराड, श्रीहरी कांदे, नदीम शेख, मोहम्मद इनामदार यांसह आदी उपस्थित होते.

 

  • वांगी तिर्थक्षेत्रास ब दर्जा देण्याबाबत पाठपुरावा…

 

वांगी येथील येथील संत नारायण बाबा संस्थानास क दर्जा प्राप्त असून ब दर्जा देण्याबाबत ग्रामस्थांनी केलेल्या मागणिबाबत सकारात्मक विचार करून या संस्थानास ब दर्जा मिळवून देण्यासाठी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांना विनंती करून पाठपुरावा करणार असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

 

संत नारायण बाबा यांच्या 65 व्या पुण्यतिथीनिमित्त वांगी येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्याच्या समाप्तीस धनंजय मुंडे यांनी भेट दिली. यावेळी श्री मुंडे यांनी संत नारायण महाराजांच्या समाधीचे दर्शनही घेतले. गावाच्या विजेच्या समस्येबाबतही लवकरच कायमस्वरूपी उपाययोजना करणार असल्याचे श्री मुंडे यांनी आश्वस्त केले.

 

कार्यक्रमास संस्थानचे ह.भ.प. एकनाथ महाराज, लक्ष्मण तात्या पौळ, राजाभाऊ पौळ, चंद्रकांत कराड, भाऊसाहेब नायबळ, सुंदर गित्ते यांसह आदी उपस्थित होते.

 

  • कांदेवाडी येथे सांत्वनपर भेट

 

आज दुपारी धनंजय मुंडे यांनी नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदीप खाडे व त्यांच्या कुटुंबियांचे कांदेवाडी (ता. धारूर) येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन सांत्वन केले; प्रदीप खाडे यांच्या वडिलांचे नुकतेच दुःखद निधन झाले होते.

Show More

Related Articles

Back to top button