बीड जिल्हासंपादकीय

सोमवारी पत्रकार संघाच्या वतीने ईद-ए-मिलाप कार्यक्रमाचे आयोजन सद्य परिस्थितीवर लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि पत्रकार यांचे खुले चर्चासत्र रंगणार

सोमवारी पत्रकार संघाच्या वतीने ईद-ए-मिलाप कार्यक्रमाचे आयोजन
सद्य परिस्थितीवर लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि पत्रकार यांचे खुले चर्चासत्र रंगणार

बीड प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, मार्गदर्शक संतोष मानूरकर यांच्या संकल्पनेतून पत्रकार संघाच्या वतीने सोमवार दिनांक 9 मे 2022 रोजी सायंकाळी 4 ते 7 दरम्यान स. मा. गर्गे भवन, बीड येथे रमजान ईद निमित्त मुस्लिम आणि हिंदू समाजातील ऐक्य अबाधित राहावे या हेतूने ईद-ए-मिलाप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमानिमित्त सद्य परिस्थितीवर आपले परखड मत मुक्तपणे मांडता यावे यासाठी खुल्या चर्चासत्राचे राज्यात पहिल्यांदाच आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ सातत्याने सामाजिक उपक्रम राबवतो. रमजान ईद संपूर्ण देशभरात शांततेत आणि उत्साहात साजरी झाली. हिंदू मुस्लिम समाजातील ऐक्य अबाधित राहुन भाईचारा कायम राहावा या हेतूने पत्रकार संघाच्या वतीने सोमवार दिनांक 9 मे 2022 रोजी सायंकाळी 4 ते 7 दरम्यान बीड येथील स. मा. गर्गे भवन, कॅनल रोड, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या पाठीमागे, बीड येथे ईद-ए-मिलाप कार्यक्रम संपन्न होणार आहे. शीरखूबाच्या आस्वादा सोबत सद्य राजकीय, धार्मिक परिस्थितीवर आपले खुलेआम परखड वैचारिक मत यावर खुले चर्चासत्र देखील याच दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमानिमित्त बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, आणि पत्रकारांनी या ईद-ए-मिलाप कार्यक्रमाचा लाभ मोठ्या संख्येने घ्यावा तसेच खुल्या चर्चासत्रात देखील सहभाग घेऊन आपले विचार प्रकट करावेत असे आवाहन पत्रकार संघाच्या वतीने मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी आणि बीड जिल्हा उपाध्यक्ष नागनाथ जाधव यांनी केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button