Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

Arjun Khotkar : शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या घरी ED चा छापा

Array


ED Raids in Arjun Khotkar’s house : माजी मंत्री आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या घरी ईडीने ( सक्तवसुली संचलनायलय) छापेमारी केली आहे. तसेच सभापती असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये ED कडून तपासणीही करण्यात आली आहे. 12 जणांच्या पथकाकडून सकाळी साडेवाठ वाजल्यापासून खोतकर यांच्या घरी ईडीकडून तपासणी करण्यात आली.   

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद मधील एका उद्योजक आणि व्यावसायिकाच्या घरी  ईडीने केलेल्या छापेमारीचं कनेक्शन खोतकरांशी असल्याचं समजतेय. जालना येथील रामनगर सहकारी साखर कारखान्याच्या व्यवहारात खोतकरांचा संबंध असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केले होते आरोप. त्या पार्श्वभूमीवर ईडीने खोतकर यांच्या घरी छापा मारत तपासणी केली.

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचे काय होते आरोप?
2012 साली टेंडर काढण्यात आले. नुसत्या जमिनीची रेडीरेकनर व्हॅल्यू 70 कोटी रुपये असताना व्हॅल्यूअरला मॅनेज करून संपूर्ण कारखान्याची लँड, प्लॉट, आणि मशनरी प्राईस फक्त 42 कोटी ठेवण्यात आली.
 महाराष्ट्र सरकारचे शंभर एकर जमीन एम एस सी बँकेकडे नसतानासुद्धा विकण्यासाठी काढली, खोतकर यांच्या संबंधित तीन कंपन्यांनी यासाठी टेंडर भरले.
औरंगाबाद मध्ये छापा टाकण्यात आलेल्या एका उद्योजकाचे  आणि व्यावसायिकाचे खोतकर यांच्यशी साखर  कारखान्याच्या माध्यमातून अर्थपूर्ण संबंध असल्याचा  सोमय्याचा आरोप.
औरंगाबाद मधील एका उद्योजकाने 43 कोटींचा कारखाना अर्जुन खोतकर यांच्या अर्जुन सीडस इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीला 27.58 कोटी रुपयांना विकला..असाही आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह – ABP Majha

संबधित बातम्या :

पोलिसांच्या निलंबनावरुन शिवसेना नेते अर्जुन खोतकर आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आमने-सामने 

दानवे माझी महेबूबा, मी त्यांच्यावर प्रेम करतो, ते माझ्यावर इश्क करतात : अर्जुन खोतकरSource link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here