Google search engine
HomeUncategorizedPune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त...

Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर…


बंडगार्डन पोलिसांकडून चोरट्यास अटक, 13 दुचाकी जप्त 

 “लॉकडाऊन’मध्ये हातचा रोजगार गेला, त्यानंतर पैसे कमाविण्यासाठी त्याने थेट वाहनचोरीचाच मार्ग निवडला. एवढेच नव्हे, तर ससून रुग्णालयात उपचार घेणाऱ्या नातेवाईकाला भेटण्यासाठी आल्यानंतर त्याने दुचाकी चोरीला सुरूवात केली. या चोरट्याला बंडगार्डन पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्या ताब्यातुन 13 दुचाकी वाहने पोलिसांनी जप्त केली. न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अख्तर चांद मुजावर (वय 44, रा.बनवडी, कोरेगाव, सातारा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी अख्तर मुजावर हा ससूनमध्ये उपचार घेणाऱ्या नातेवाईकांना ऑगस्ट महिन्यात भेटण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याने दुचाकी चोरीली. तेथून पुढे त्याने नियमीतपणे वाहनचोरी सुरू केली. चोरलेल्या दुचाकी विकण्याचा प्रयत्न केला. मात्र कागदपत्रे नसल्याने ग्रामीण भागातील त्याच्याकडील दुचाकी घेतल्या नाहीत.’


महिलेला भेटण्यासाठी आलेल्या दोघांना बेदम मारहाण, एकाचा जागीच मृत्यू तर एकजण गंभीर जखमी

पुण्यातील कोंढवा परिसरातून  एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला. एका महिलेला भेटण्यासाठी आलेल्या दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. रवी कचरू नागदिवे (वय 50) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर या घटनेत एक रिक्षा चालक गंभीर जखमी झाला आहे. मयत रवी हा उरळीकांचन येथून कोंढवा परिसरात एका महिलेला भेटण्यासाठी रिक्षा करून आला होता. हा प्रकार लक्षात आल्यानंतर काही नागरिकांनी रवी आणि रिक्षा चालकाला बेदम मारहाण केली. यामध्ये रवीचा जागीच मृत्यू झाला तर रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मयत आणि जखमी दोघांनाही रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. 

अजित पवार तुरुंगात जाणार हा एक शब्दप्रयोग – किरीट सोमैया

उपमुख्यमंत्री अजित पवार तुरुंगात जाणार हा एक शब्दप्रयोग आहे. तुरुंगात जाणं म्हणजेच कारवाई होणं. कारण सर्वांना तुरुंगात टाकणं शक्य नाही, असं म्हणत भाजप नेते किरीट सोमैय्यांनी तुरुंगाच्या भाषेवर अक्षरशः यु टर्न घेतला आहे. प्रत्येकवेळी तुम्ही अजित पवार तुरुंगात जाणार असं म्हणता पण प्रत्यक्षात तसं घडतच नाही. भाजपचाच अजित पवारांना पाठिंबा आहे का? असा प्रश्न पिंपरी चिंचवडमधील पत्रकार परिषदेत सोमैय्यांना विचारण्यात आला. तेंव्हा तुरुंगात जाणार या वक्तव्याकडे शब्दप्रयोग म्हणून पहा. असं म्हणत तुरुंगात जाणं म्हणजेच कारवाई होणं आणि अशी कारवाई झाल्यावर तुम्ही माझं कौतुक तरी करा. असं उलट आवाहन सोमैयांनी केलं. पण हे करताना अजित पवार तुरुंगात जाणार नाहीत हे सोमैयांनी यावेळी जणू स्पष्ट केलं. Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments