Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत महाविकास आघाडीचा झेंडा

Array


Sangli District Bank Election Result: राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aghadi) प्रभाव पाहायला मिळालाय. विकास सोसायटी गटात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेनेच्या (Shiv Sena) सहकार विकास पॅनेलने सातपैकी सहा जागा जिंकत हुकुमत राखली. मात्र, जतमध्ये काँग्रेसचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांचा धक्कादायक पराभव झालाय. तेथे भाजप आणि राष्ट्रवादीची जुनी मैत्री काँग्रेसला भारी ठरलीय. 

यापूर्वी महाविकास आघाडीतून शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक तर काँग्रेसचे महेंद्र लाड हे बिनविरोध निवडून आले. त्यामुळं आता एकूण संख्याबळात राष्ट्रवादीला सर्वाधिक 9, काँग्रेस 5, भाजप 4, शिवसेना 3 असा निकाल लागलाय. या निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादीचे नेते जयंतराव पाटील यांचा राजकीय चाणाक्षपणा दिसून आलाय. या ही निवडणुकीत काही ठिकाणी करेक्ट कार्यक्रम झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळं महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढवली असली तरी कॉंग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत छुपा संघर्ष या निवडणुकीच्या निमित्ताने दिसून आलाय. 

महाविकास आघाडीनं सहकार विकास पॅनलच्या माध्यमातून सांगली जिल्हा बँकेची निवडणूक कपबशी चिन्हावर लढवली. तर, भाजपन शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून विमान चिन्हावर निवडणूक लढविली. तशी एक तर्फे वाटत असलेल्या या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग मुळे रंगत आली. क्रॉस व्होटिंगमुळं काही ठिकाणी आश्चर्यकारक निकाल लागलाय. मात्र, शेवटी महाविकास आघाडीचाच झेंडा यांच्यावर फडकवलाय. काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना तीन पक्षांचा हा एकत्रित विजय असल्याचं जयंत पाटील यांनी म्हंटलय.

जिल्हा बँकेच्या ठरावावरून आटपाडी गोपीचंद पडळकर आणि शिवसेना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. यामुळं आटपाडी मधील सोसायटी गटाची निवडणूक अटीतटीची बनली होती. यात महाआघाडीतील शिवसेनेचे तानाजी पाटील हे 11 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे माजी आमदार राजेंद्र देशमुख यांचा पराभव केला. आटपाडी सोसायटी गटातून विजयी झालेल्या तानाजी पाटील यांची निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आटपाडीत झालेल्या राड्यावरुन भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली. मताची बेरीज बसत नसल्यानं राडा करणे हेच काम विरोधकांकडे राहिले होते, राडा जरी झाला तरी तो आम्ही आवरला. मतासाठी विरोधकांनी लाखोंनी पैसे मोजले, पण मतदारानी त्याना न जुमानता मला मतदान केले. मतदान केंद्रावर वेगवेगळ्या राज्यातील लोक विरोधकांनी आणली होती. पण आमच्याकडे मतांचे बहुमत असल्यानं आम्हाला राडा करायचा नव्हता, असे शिवसेनेचे तानाजी पाटील यानी प्रतिक्रिया दिलीय. 

जत मधील निकाल सर्वात धक्कादायक मानला जात आहे. जत सोसायटी गटात काँग्रेसला मोठा धक्का बसला असून विद्यमान संचालक, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार विक्रम सावंत पराभूत झाले आहेत. त्यांचे विरोधक असलेल्या भाजपच्या प्रकाश जमदाडे यांना 45 मत मिळाली. तर, विक्रम सावंत यांना 40 मत मिळाली. विषेश म्हणजे, सावंत हे राज्याचे मंत्री विश्वजीत कदम यांचे मावस भाऊ आहेत.

या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे नेते जयंतराव पाटील यांचा राजकीय चाणाक्षपणा दिसून आलाय. या ही निवडणुकीत काही ठिकाणी करेक्ट कार्यक्रम झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढवली असली तरी कॉंग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत छुपा संघर्ष या निवडणुकीच्या निमित्ताने दिसून आलाय

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

हे देखील वाचा- Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here