Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

सरकारला ओबीसी आरक्षण संपवायचंय?; पंकजा मुंडेंचा महाविकास आघाडी सरकारवर कडाडल्या

Array


Pankaja Munde on OBC Reservation : “आयोगाला पुरेसा निधी देण्याची गरज असतानाही, सरकारनं 15 महिन्यांमध्ये 7 वेळा तारखा बदलून मागितल्या. त्याशिवाय दुसरं काहीही केलेलं नाही. यापूर्वीही मी म्हटलं होतं की, या सरकारला ओबीसी आरक्षण असुरक्षित करायचंय की, काय? ओबीसी आरक्षण संपुष्टात आणायचंय की, काय? असा प्रश्न राज्यातील ओबीसींमध्ये आहेत.”, असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे यांनी ओबीसी आरक्षणावरुन महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. 

“ओबीसी आरक्षण संरक्षित नसताना एक अध्यादेश काढला. कारण लोकांनी आक्रोश केला. लोक रस्त्यावर उतरले. लोकांनी चक्काजाम केला. यानंतर एक अध्यादेश काढून ओबीसी आरक्षण संरक्षित करण्याचं महाराष्ट्र शासनानं ढोंग घेतलेलं आहे. यामध्ये हा अध्यादेश आहे, त्याविरोधात औरंगाबाद खंडपीठात लोकांनी दाद मागितली आहे. न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहूनच या अध्यादेशाची कारवाई होणार आहे. आता या अध्यादेशामुळे ओबीसीच्या आरक्षणावर निवडणूक लढणाऱ्या लोकांच्या डोक्यावर टांगती तलवार नेहमीच राहणार आहे, ही दुर्दैवाची बाब आहे, आणि महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणारी गोष्ट आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. 

 



Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here