Google search engine
HomeUncategorizedPune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त...

Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर…


Pune : पुणे महापालिकेचे एक कोटी रुपयांचे बोगस बिल, न झालेल्या कामाचे बिल अदा करण्याची प्रक्रिया पूर्ण 

महापालिकेच्या प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचे अजून एक उदाहरण समोर आलंय. अनेक नवनवे घोटाळे करण्यासाठी ओळखली जाणारी पुणे महापालिका आता चक्क न केलेल्या कामांसाठी एक कोटी रुपये वाटायला निघाली होती. आरोग्य विभागाच्या एका न झालेल्या कामाचे एक कोटी रुपयांचे बिल अदा करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे.  नवी पेठ येथील वैकुंठ स्मशानभूमी, हडपसर येथील अमरधाम, कोथरूड आणि बाणेर येथील स्मशानभूमीमधील विद्युत विषयक कामांचे एकूण एक कोटींच्या रक्कमेचे बिल अदा करण्याची सगळी प्रक्रिया पूर्ण होऊन बिल अदा करण्यात यावे असा शेरा विभागाकडून देण्यात आलेला होता. मात्र ज्या आरोग्य विभागाचे हे काम होतं त्यांना याची कुठलीच कल्पना नव्हती. जेव्हा या कामांची विचारणा त्यांच्याकडे झाली तेव्हा असं कुठलंही कंत्राट दिलेलेच नसल्याचा खुलासा झाला अन् आता प्रकरणी पुणे महापालिकेने ठेकेदाराविरोधात शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलीस त्याचा तपास करत आहेत.

पुण्यात सलीम अली पक्षी अभयारण्य धोक्यात

पुणे शहाराच्या मधोमध मुठा नदीच्या काठावर असलेले सलीम अली पक्षी अभयारण्य इथं आढळणाऱ्या देशी – विदेशी पक्षांसाठी ओळखलं जातं. मात्र गेल्या काही दिवसांपासून रस्त्याने होणारी अतिक्रमणं आणि महापालिकेकडून त्याकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळं पुण्याचं फुफ्फुस म्हणवणारं हे अभयारण्य धोक्यात आलं आहे.  पुणे शहराच्या अगदी मधोमध  घनदाट जंगल टिकून असून पक्षी अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. मुठा नदीच्या काठावरील  22 एकरांच्या या हिरव्या पट्ट्यात शेकाट्या, तांबट, नदी सुरय, राखी बगळा, कोतवाल, सातभाई, पारवा, पोपट लालबुड्या बुलबुल, पोपट असे देशी आणि युरेशियन स्पुनबिल, कॉमन तिल , नॉर्दर्न पाइंन्टेल , गर्गनेई असे अनेक विदेशी पक्षी आढळतात . शिवाय शेजारच्या मुठा नदीतही हळदी – कुंकू, टिबुकली, गायबगळा, खंड्या, धोबी, टिटवी  अशा पाणथळ भागात राहणाऱ्या पक्षांचा किलबिलाट सुरु असतो . मात्र आता हे सगळं धोक्यात आले आहे. कारण दररोज इथं ट्रक भरभरून राडा रोडा टाकला जात आहे. त्यामुळं मुठा नदीचं पात्र येथे तब्ब्ल वीस ते बावीस फूट उंच उचललं गेलंय. त्याचा परिणाम या नदीकाठावर आढळणाऱ्या झाडांवर आणि पक्षांवर तर होत आहे. शिवाय पावसाळ्यात पुराचा धोकाही त्यामुळं निर्माण झालय.Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments