Google search engine
HomeUncategorizedPune Crime : पुणे हादरले; मित्राने 16 वर्षीय मुलासोबत केलं अनैसर्गिक कृत्य

Pune Crime : पुणे हादरले; मित्राने 16 वर्षीय मुलासोबत केलं अनैसर्गिक कृत्य


Pune Crime News : मित्राने अल्पवयीन मित्रासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याच्या धक्कादायक घटनेनं पुणे (Pune Marathi News) हादरले आहे. दांडेकर पूल परिसरात ही खळबळजनक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलाला स्वच्छतागृहात नेऊन शारीरिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये (dattawadi police station) तक्रार दाखल केली आहे.  पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

पुण्यात एका तरुणाने 16 वर्षीय मित्रावर अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.तळजाई पठार येथे राहणारा पीडित 16 वर्षीय अल्पवयीन मुलगा दांडेकर पूल येथील 21 वर्षीय सागर सोनवणे नामक मित्राच्या घरी आला होता. तिथंच ओळखीचा फायदा घेऊन सोनवणेने त्या पीडित मुलाला स्वच्छतागृहात नेलं आणि मारहाण करून केली. त्यानंतर त्यासोबत अनैसर्गिक शारीरिक अत्याचार केले. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, या घटनेनं पुण्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलाने आपल्यासोबत घडलेला प्रसांगाबाबत कुटुंबियांना माहिती दिली. त्यानंतर कुटुंबियांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभिर्य लक्षात घेत तात्काळ गुन्हा दाखल केला अन् शोधमोहिम हाती घेतली. पोलिसांनी 21 वर्षीय आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे. पीडित मुलावर ससूण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.   

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह – ABP MajhaSource link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments