Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर…

Array


94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटकाच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब
94 व्या  अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या   उदघाटकाच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब  झाला आहे.  प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या हस्ते होणार उद्घाटन यासोबतच विशेष अतिथी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गीतकार जावेद अख्तर  उपस्थिती लावणार आहे. संमेलनाचा समारोप राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते होणार आहे,  स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली आहे.

तोडगा नाही, एसटी संपावर मार्ग काढण्यासाठी परिवहन मंत्र्यांची बैठक संपली
मागील एक तासापासून सुरू असलेली बैठक संपली. बैठकीत तूर्तास तरी काहीच तोडगा नाही.  कर्मचारी मात्र संपावर ठाम  आहे. अनिल परब यांच्याकडून सरकार विलीनीकरणाबाबत पॉझिटिव्ह असल्याबाबतचे संकेत दिले आहे.  लवकरच पुन्हा एकदा बैठकीचं आयोजन करण्यात येणार आहे

आझाद मैदानावरील संपकरी आक्रमक, अनिल परबांच्या घरावर मोर्चा काढण्यावर ठाम
आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांकडून संप सुरु असून मोर्चेकरी आता परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावह मोर्चा धडकणार आहेत. त्यामुळे अनिल परबांच्या घरासमोरील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. 

एसटी संपावर मार्ग काढण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांची बैठक
एसटी संपावर मार्ग काढण्यासाठी मुंबई सेंट्रल ऑफिस येथे परिवहन मंत्री अनिल परब यांची बैठक होणार आहे.  बैठकीला महाराष्ट्र राज्य कनिष्ठ श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर उपस्थित राहणार आहे.  कर्मचारी संघटना अजूनही एसटी महामंडळाच्या विलीनीकरणावर ठाम आहे. बैठकीसाठी सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर यांना निमंत्रण नाही.  एसटी महामंडळाकडून सुरुवातीला संपाची नोटीस देणाऱ्या एसटी कर्मचारी संघटनेला चर्चेसाठी निमंत्रण देण्यात आले आहे, 

तारक मेहता का उल्टा चष्माच्या याकलाकाराच्या मुलानं दिली मुंबई उडवण्याची धमकी
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील एका कलाकाराच्या मुलाकडून मुंबई बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. अंधेरी पोलिसांना फोन करुन मुंबई उडवण्याची धमकी दिली आहे. धमकी देणाऱ्याला अंधेरी पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Vikram Gokhale Controversy : अभिनेते विक्रम गोखले त्याविधानावर ठाम 
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale)  यांनी अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana Ranaut) स्वातंत्र्याबाबत केलेल्या वक्तव्याचे समर्थन केले. त्यानंतर विक्रम गोखले यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटू लागले. परंतु स्वातंत्र्याबाबतच्या वक्तव्यावर अभिनेते विक्रम गोखले ठाम आहेत. खरं स्वातंत्र्य 2014 पासूनच मिळालं यावर ठाम असून ते बदलणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here