Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटकाच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब

Array


Marathi Sahitya Sammelan : कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे नाशिक येथे होणारे 94 वे मराठी साहित्य संमेलन काही काळासाठी स्थगित करण्यात आलं होतं. त्यामुळे यंदाचं ‘अखिल भारतीय मराठी 94 वे साहित्य संमेलन’ गोदावरी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज नगरीत होणार आहे. आजवर झालेल्या साहित्य संमेलनाच्या तुलनेत यंदाचे साहित्य संमेलन बहारदार करण्याचा आयोजकांचा प्रयत्न होता. मात्र साहित्य संमेलनाला उद्घाटक मिळालेला नव्हता. पण आता उद्घाटकाचे नाव अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. 

94 व्या  अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या  उदघाटकाच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब  झाला आहे. प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या हस्ते साहित्यसंमेलनाचे उद्धाटन होणार असून विशेष अतिथी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गीतकार जावेद अख्तर  उपस्थिती लावणार आहे. संमेलनाचा समारोप राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते होणार आहे. स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. 

3 ते 5 डिसेंबर दरम्यान भुजबळ नॉलेज सिटीमध्ये 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरणार आहे. खगोल शास्त्रज्ञ  विज्ञान लेखक जयंत नारळीकर या संमेलनाचे अध्यक्ष आहेत.  त्यामुळे विज्ञानवादी साहित्य संमेलन या संमेलनाचा पाया आहे,  बालसाहित्य,  कवीकट्टा,  कथाकथन, ग्रंथ दिंडी,  असे भरगच्च कार्यक्रम साहित्य संमेलनात आहेत. 

राजसत्ताचा निर्दयीपणा, मराठी नाटक एक पाऊल पुढे, दोन पावले मागे, कोरोनानंतरचे अर्थकारण मराठी साहित्य व्यवहार, ऑनलाइन वाचन वाङ्मय विकासाला तारक की मारक साहित्य निर्मितीची कार्यशाळा गरज की थोतांड, गोदतीराच्या सतांचे योगदान, नाशिक जिल्ह्याला 151 वर्ष पूर्ण झाल्याबाबत जिल्ह्याचा जागर अशा परिसंवादाची मेजवानी अनुभवायला मिळणार आहे.

संबंधित बातम्या

Sahitya Sammelan : साहित्य संमेलनाची तयारी जोरात, पण उद्घाटकच्या नावाची चर्चाच नाही…

ST Strike : संप मागे घ्या, उच्च न्यायालयाच्या अहवालावर सरकार सकारात्मक निर्णय घेईल; अनिल परबांचं आवाहन 

‘Jug Jugg Jeeyo’ Release Date: कियारा आडवाणी, वरुण धवनचा आगामी ‘जुग-जुग जियो’ सिनेमा ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

 Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here