Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर…


रिक्षा भाडेवाढीनंतर पुणेकरांना दुसरा झटका, सीएनजी दरात 1 रुपया 80 पैशांची वाढ

रिक्षा भाडेवाढीनंतर (Pune Auto Rickshaw fare hike) आता पुणेकरांवर नवं संकट ओढवलंय.  इंधन दरवाढ  (Petrol Price Hike)झालेली नसली तरी पुण्यात सीएनजी दरात प्रतिकिलोमागे  1 रुपया  80 पैशांची वाढ करण्यात आली. त्यामुळे पुणेकरांना एक किलो सीएनजीसाठी 63.90 रु. मोजावे लागणार आहेत. पुण्यात सीएनजीच्या किमतीत प्रती किलो 1 रुपये 80 पैशांची वाढ करण्यात आली. त्यामुळे आधीच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे हैराण झालेल्या सामान्य जनतेला या सिलेंडरच्या किंमती वाढीमुळे धक्का बसला आहे. याचा पुणेकरांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आता पुण्यातील सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांच्या भाड्यातही वाढ होऊ शकते.

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला.

  त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला.यानिमित्त संपूर्ण मंदिर परिसरात दिवे लावण्यात आले असून या दिव्यांच्या रोषणाईने संपूर्ण मंदिर परिसर उजळून निघाला. गणपती मंदिर परिसरात होत असलेला हा दीपोत्सव पाहण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. तर दुसरीकडे सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरात 11000 दिव्यांची आरास करून दीपोत्सव साजरा केला गेला.

देहूरोडमधील एका बुलेटस्वाराच्या गाडीतून चोरट्याने केले बाटली भरून पेट्रोल लंपास

पेट्रोलचे दर शंभरी पार झाल्यापासून दुचाकीस्वार हैराण झालेत. यातूनच पेट्रोल चोरीचे प्रमाण वाढू लागलंय. अशीच एक चोरी सीसीटीव्हीत देखील कैद झालीये. देहूरोडमधील एका बुलेटस्वाराच्या गाडीतून चोरट्याने बाटली भरून पेट्रोल लंपास केलं. अनेकदा असा प्रकार त्याच्यासोबत घडत होता, म्हणूनच त्याने सीसीटीव्ही रिसिव्हर तपासलं. तेंव्हा पेट्रोल चोरी होत असल्याचं निष्पन्न झालं. एकतर प्रति किलोमीटर त्यांना अधिकचे पैसे मोजावे लागतायेत अन दुसरीकडे पेट्रोल चोरट्यांनी डोकेदुखी वाढवली आहे.

 Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here