Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

Amravati violence : दंगलीनंतर अमरावतीत उद्यापासून संचारबंदीत मोठा दिलासा

Array


अमरावती : अमरावतीत हिंसाचार होऊन आठवडा लोटल्यानंतर उद्यापासून संचारबंदीतून मोठा दिलासा मिळाला आहे. अमरावती शहरातील उद्यापासून सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत संपूर्ण बाजारपेठ उघडण्याची मुभा देण्यात आली आहे.  सायंकाळी 6 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे. 

आज शहरातील जीवनावश्यक वस्तूंची दुकानं आणि कृषी साहित्याची दुकानं सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत आणि दुपारी 3 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उघडणार आहेत. परीक्षार्थींना संचारबंदीत सवलत कायम ठेवण्यात आली आहे.

अमरावती शहरात आज दुपारी तीन वाजता इंटरनेट सेवा सुरू झाली आहे. 13 नोव्हेंबरपासून इंटरनेट सेवा  बंद होती. अखेर आज सातव्या दिवशी इंटरनेट सेवा सुरू झाली आहे. अमरावती शहरात 12 आणि 13 नोव्हेंबरला झालेल्या हिंसाचारानंतर शहरात संचारबंदी लावण्यात आली आणि 13 नोव्हेंबरला शहराची इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.शहरात इंटरनेट सेवा बंदमुळे विद्यार्थ्यांना याचा फटका बसत होता. आज (19 नोव्हेंबर)  दुपारी तीन वाजता इंटरनेट सेवा सुरू झाली आहे. 

त्रिपुरातील (Tripura Violence)घटनेचे पडसाद महाराष्ट्राच्या काही भागात उमटले. यात अमरावतीमध्ये वातावरण खूप तणावाचे झाले होते. आक्रमक आंदोलकांनी या दुकानांवर दगडफेक करत तोडफोड केली. यानंतर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनीही आक्रमक पवित्रा घेत दगडफेक करणाऱ्यांवर लाठीचार्ज केला.अमरावतीत निघालेल्या मोर्चांना हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं. मोर्चादरम्यान अमरावतीत झालेली तोडफोड कॅमेऱ्यात कैद झाली. राज्यात काही ठिकाणी जाळपोळ, दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. या घटनेच्या निषेधार्थ काही ठिकाणी बंद पुकारण्यात आला होता.

बांग्लादेशमध्ये काय घडलं?
ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात दुर्गापूजेदरम्यान बांग्लादेशात हिंसाचार झाला. बांग्लादेशातील चांदपूर, कमिला जिल्ह्यांमध्ये दुर्गापूजेदरम्यान तोडफोड करण्यात आली. दुर्गापूजा स्थळावर कुराण आढळल्याच्या आणि कुराणाचा अपमान झाल्याच्या कथित प्रकरणानंतर हिंसाचार सुरु झाला. त्यानंतर चांदपूरमधील हाजीगंज, चट्टोग्राममधील बंशखली, चपैनवाबगंज, काक्स बाजार या परिसरात घरांची, मंदिरांची तोडफोड करण्यात आली. या हिंसाचारात काही जणांचा मृत्यू झाला. अनेक नागरिक जखमी झाले. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

इतर महत्त्वाच्या बातमी :

 Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here