Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

Maharashtra Corona Update : राज्यात आज 963 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Array
मुंबई : कोरोनाबाधितांच्या (coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात आज 963 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 972 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 71 हजार 763 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.65 टक्के आहे.

राज्यात आज 24 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 11 हजार 732  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 1 लाख 16 हजार 282  व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1024 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 43 , 84, 736 प्रयोगशाळा  तपासण्या करण्यात आल्या आहे.

मुंबईत आज 230 रुग्णांची भर तर एकाचा मृत्यू

गेल्या 24 तासात मुंबईत 230 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात 204 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. शहराचा रिकव्हरी रेट हा 97 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत सध्या 2845 इतकी सक्रिय रुग्णसंख्या आहे. शहरात आतापर्यंत 7,38,803 रुग्णं कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 2845 दिवसांवर पोहोचला आहे. तसेच शहरातील कोरोना वाढीचा दर हा 0.03 टक्के इतका झाला आहे.

पुण्यात गेल्या 24 तासात 92 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

पुण्यात गेल्या 24 तासात 92 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 47 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यात आतापर्यंत 495729 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात दोन कोरनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या पुण्यात 886 सक्रिय रुग्ण आहेत. आज पुण्यात  4797नागरिकांची स्वॅब तपासणी झाली आहे.

देशात 24 तासांत 12 हजार कोरोनाबाधितांची नोंद

देशात जीवघेण्या कोरोना व्हायरस  (Coronavirus) च्या प्रादुर्भावात घट होताना दिसत आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 11 हजार 919 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 470 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या एक लाख 28 हजार 762 इतकी आहे. जाणून घ्या देशातील सद्यस्थिती… केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 11 हजार 242 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अशातच या महामारीमुळे जीव गमावलेल्यांचा आकडा वाढून 4 लाख 64 हजार 623 वर पोहोचला आहे. आकडेवारीनुसार, अद्याप एकूण 3 कोटी 38 लाख 85 हजार 132 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here