Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

बळीराजा दुहेरी पेचात! इकडे आड, तिकडे विहिर; अवकाळी पाऊस त्यात महावितरणाची नोटीस

Array


मुंबई : एकीकडे शेतमालाला हमी भाव मिळत नाही, तर दुसरीकडे अतिवृष्टीने हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जात आहे. अशात आता सरकार पण शेतकऱ्यांची परीक्षा घेतंय का?, असा सवाल विचारला जातोय. कारण एकीकडे राज्य शासनानं अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाई म्हणून काही रक्कम देऊ केली. आणि आता महावितरणकडून शेतकऱ्यांनी वीज बिल भरले नाही म्हणून सरसकट डीपी डिस्कनेक्ट केले जातायत. त्यामुळे पिकांना पाणी कसं द्यायचं, असा प्रश्न शेतकर्‍यांसमोर उभा राहीलाय. त्यातच 3 एचपी मोटरसाठी 10 हजार तर 5 एचपी मोटरसाठी 15 हजार भरण्याचीही महावितरणकडून सक्ती केली जात असल्याचं बळीराजा सांगतोय.

दरम्यान वीजबिलांच्या प्रचंड थकबाकीमुळे महावितरण कंपनी सध्या आर्थिक संकटात आहे. राज्यात सर्वाधिक थकबाकी कृषिपंपधारक शेतकऱ्यांकडे आहे. हे ग्राहक वीजबिल भरतच नसल्याची ओरड सातत्याने केली जाते. राज्यात महावितरणच्या थकबाकीचा डोंगर सध्या खूप मोठा झाला आहे. ही अभूतपूर्व थकबाकी वसूल करण्याचे मोठे आवाहन महावितरणपुढे आहे. असे असले तरी लॉकडाऊनकाळात वीज ग्राहकांना वाढीव बिलांचा शॉक बसला. आधीच अनेकांचे रोजगार गेले, त्यात वाढीव वीजबिले आल्याने सर्वसामांन्यांचे कंबरडे मोडले. त्यात आता पिकांना पाणी देण्याच्या एचपी मोटरसाठी  10 ते 15 हजार भरण्याची सक्ती वीजबिल भरण्यासाठी महावितरणने केली आहे. 

राज्यात अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका

हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसानं झोडपलं. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील येवला, मनमाड परिसरात जोरदार सरी बरसल्या. पावसामुळे कांदा लागवडीर परिणाम होणार आहे तर ढगाळ वातावरणामुळे कांद्यावर रोगाचा प्रादुर्भावही वाढलेला दिसतोय. त्यामुळे कांदा खराब होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. तिकडे वाशिम आणि हिंगोलीतही अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. रात्री 9 पासून बरसलेल्या कारंजा तालुक्यातील दीड तासांच्या पावसानं गहू पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना फायदा झाला असला तरी तूर, हरभरा उत्पादकांना मात्र नुकसानाची भीती आहे. तिकडे हिंगोलीत पावसानं हजेरी लावल्यामुळे नागरिकांची उकाड्यातून काही वेळासाठी सुटका झाली.

संबंधीत बातम्या

शेतकऱ्यांचं थकित वीजबिल ऊस बिलातून वसूल करण्याचे आदेश, साखर आयुक्तांचे साखर कारखान्यांना पत्र

राज्यात घरगुती इलेक्ट्रिक मीटर होणार स्मार्ट! मोबाईलसारखे रिचार्ज करुन वीज वापरता येणार; फायदाही जाणून घ्या

Maharashtra Uncertain Rain : राज्यात अवकाळी पाऊस, पिकांचं मोठं नुकसानSource link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here