Google search engine
HomeUncategorizedपुणे दौऱ्यात अमित शाहंनी पवारांच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देण्याचं टाळलं

पुणे दौऱ्यात अमित शाहंनी पवारांच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देण्याचं टाळलं


पुणे : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा 26 नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते माजी कृषीमंत्री शरद पवार अध्यक्ष असलेल्या पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देणार अशी चर्चा होती. पण आता अमित शाह या संस्थेला भेट देणार नसल्याची माहिती समोर येतेय. त्या ऐवजी भाजपची सत्ता असलेल्या पुणे महापालिकेला चे भेट देणार आहेत. अमित शाहंनी वसंतदादा शुगरल इन्स्टिट्यूटची भेट जाणिवपूर्वत टाळली अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 

या दौऱ्यात अमित शहा पुण्यातील वैकुंठभाई मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ को-ऑपरेशन या संस्थेत आयोजित करण्यात आलेल्या सहकार परिषदेला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमानंतर अमित शहा पुण्यातील वसंतदादा शुगर  इन्स्टिट्यूटला भेट देतील असं सांगण्यात आलं होतं. 

पुणे दौऱ्यात शहांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट द्यावी यासाठी संस्थेचे प्रमुख या नात्याने शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी अमित शहांची दिल्लीत भेट घेऊन त्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देण्याच आमंत्रण दिलं होतं. त्यावेळेस शहांनी हे आमंत्रण स्वीकारल्याचे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून सांगण्यात आले होते. मात्र पुणे भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या अमित शहांच्या पुणे दौऱ्यात व्हीएसआयचा उल्लेख नाही. त्याऐवजी अमित शहा पुणे महापालिकेला भेट देणार आहेत. 

महापालिकेच्या भेटीनंतर अमित शहांच्या उपस्थितीत पुण्यातील गणेश कला- क्रीडा संकुलात भाजपकडून कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आलंय. अमित शहांचा अधिकृत दौरा अजून जाहीर झालेला नसला तरी पुणे भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी अमित शहांच्या दौऱ्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा समावेश नव्हताच असं म्हटलंय.

येत्या 26 नोव्हेंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौर्‍यात अमित शाह पुणे महापालिकेत सुद्धा एका कार्यक्रमाच्या निमित्ताने जाण्याची शक्यता आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या दौऱ्याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. वैकुंठभाई मेहता सहकारी संस्थेत कार्यक्रमाच्या निमित्ताने सहकारमंत्री येत आहेत. महापालिकेमध्ये दोन पुतळ्यांच्या अनावरणाचा कार्यक्रम अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. 

पुणे महानगरपालिकेला नुकताच स्वच्छ भारत अभियान अंतर्गत एक राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराचं वितरण शनिवारी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या नोटिफिकेशन ज्या पद्धतीने येत आहेत ते बघता महापालिका निवडणुका वेळेवर होतील. गेल्या पाच वर्षात जी कामे झाली आहेत ती पाहता मतदार पुन्हा एकदा भाजपला कौल देतील हा विश्वास महापौरांनी व्यक्त केला. 

महत्वाच्या बातम्या : 

 Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments