Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

तुरीचे पीक जोमात; मात्र बदलत्या वातावरणामुळे फुल गळती; कांद्यानंतर आता खरिपातील पीक धोक्यात

Array


धुळे : जिल्हयात दोन दिवसापूर्वी ठिकठिकाणी झालेला पाऊस हा रब्बी हंगामासाठी पोषक होता पण वातावरण बदलाचे परिणाम आता खरीप हंगामातील पिकावर जाणवू लागले आहेत. या अवकाळी पावसामुळे  कापसाच्या बोंड्याचे नुकसान झाले आहे तर तुरीलाही धोका निर्माण झाला आहे. खरीप हंगामातील कापूस आणि तूर ही दोनच पीकं सध्या वावरात आहे. कापसाची वेचणी सुरु झाली आहे. मात्र, तूर पीकं हे फुल अवस्थेतच आहे. बदलत्या वातावरणामुळे तुरीवर अळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे तर फुलगळतीचे प्रमाणही वाढलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य वेळीच फवारणीची कामे केली तरच हे पीक देखील पदरात पडणार आहे. 

मध्यंतरीच्या अतिवृष्टीने कांदा या पिकाचे नुकसान झाले होते. तर आता अवकाळी पावसाचा परिणाम हा कापूस आणि तुरीवर होऊ लागला आहे. सध्या तूर फुलोऱ्यात शेंग लागणीच्या अवस्थेत आहे. त्यामुळे या पिकातून शेतकऱ्यांना उत्पादनाची आशा आहे. मात्र, कांदाप्रमाणेच अंतिम टप्प्यात तुरीची अवस्था झालेले आहे. मात्र, अधिकचे नुकसान टाळण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्यासाठी शेतकऱ्यांकडे फवारणीचा पर्याय आहे. 

फवारणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू असून मध्यंतरीच्या पावसातून तूर पिकाला फटका बसलेला नाही. पण सध्याच्या बदलत्या वातावरणाचा धोका निर्माण झाला आहे. विशेष: खान्देशातील वातावरणात बदल झालेला आहे. ढगाळ वातावरण अद्यापही कायम आहे. त्यामुळे तुरीवर शेंग अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे. शिवाय फुल गळतीचे प्रमाणही वाढलेले आहे. त्यामुळे अंतिम टप्प्यात आलेले पिक पदरात पाडून घेण्यासाठी शेतकरी आता फवारणीच्या कामाला लागलेला आहे. शिवाय किटकनाशकांचे दरही वाढलेले आहेत. मात्र, कांदाप्रमाणेच तुरीचेही नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी फवारणी करुन घेत आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह – ABP Majha



Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here