Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

अल्पवयीन मुलीवर कौर्याची परिसीमा; दारू पाजून पोलिसांनी केले अत्याचार

Array


rape of minor victim beed अंबाजोगाईतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार  प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १० जणांना अटक केली आहे. यामध्ये अंबाजोगाई शहरात राहणाऱ्या एका महिलेला व ग्राहक शोधण्याचं काम करणाऱ्या निलंबित मुख्याध्यापकाला पोलिसांनी  अटक केली  आहे.  या दोन्ही आरोपींना अंबाजोगाईतील जिल्हा व सत्र न्यायालयाने 19 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या अल्पवयीन मुलीच्या बालविवाह संदर्भात आणि पोक्सो कायदा अंतर्गत आतापर्यंत 15 जणांची चौकशी करण्यात आली आहे. त्यातील 10 जणांना अटक अथवा ताब्यात घेतले आहे.

कौर्याची परिसीमा 

पीडित अल्पवयीन मुलीचे १३ व्या वर्षीच धारूर तालुक्यातील एका गावातल्या तरुणासोबत लग्न लावून देण्यात आले होते. या पीडितेचा पती धारूरला एका ढाब्यावर काम करायचा. आठवड्यातून दोन-तीन दिवस तो घरी येत असे काम करत नाही म्हणून मारहाण करायचा. पतीकडून होणाऱ्या छळामुळे वैतागून ती आपल्या माहेरी वडिलांकडे आली. मात्र जन्मदात्यानेच तिच्या अब्रूवर हात टाकला. या अत्याचाराविरोधात तिने थेट पोलीस ठाणे गाठले. पण, पोलिसांनी तक्रार नोंदवून न घेता कुटुंबाला तोंडी समज दिली. घरी गेल्यानंतर पोलिसांमध्ये तक्रार का केली, असा जाब विचारत पीडितेला विस्तवाचे चटके देण्यात आले. त्यामुळे तिने घरातूनही पळ काढला. घरातून ती अंबाजोगाई शहरात आली. मात्र, तिथेही पीडितेच्या असहाय्यतेचा फायदा घेत अनेकांनी तिच्यावर अत्याचार केले.

जेवण देतो म्हणून अत्याचार केला

या पीडित अल्पवयीन मुलीने होणाऱ्या अत्याचाराला विरोध केल्यानंतर काहींना तिला जबर मारहाण केली. या पीडितेला दारू पाजणे, धुम्रपान करण्यास सांगणे आदी प्रकारही काही नराधमांनी केले. काहींनी तिच्याकडून वेश्याव्यवसाय ही करून घेतला असल्याची घटना समोर आली. अंबाजोगाई बस स्थानकात दोन मुलांनी जेवण देतो म्हणून तिच्यावर अत्याचार केला. अत्याचार करून हे दोघे थांबले नाहीत. तर, या पीडितेबाबत अनेकांना यांनीच माहिती दिली. काही लोकांकडून पैसे घेऊन त्यांच्यासोबत तिला पाठवले जाऊ लागले. 

दोन पोलिसांनी केले अत्याचार

आपल्यावर ओढावलेल्या संकटाची माहिती या पीडितेने बालकल्याण समितीसमोर सांगितली आहे. अल्पवयीन मुलीवर दोन पोलिसांनी अत्याचार केला. एका पोलिसाने लॉजवर, तर दुसऱ्याने त्याच्या घरी नेऊन अत्याचार केला. या पीडितेला अत्याचार केलेल्या पोलिसांची नावे ठाऊक नाही. या दोन पोलिसापैकी एकानेच तिला अंबाजोगाईजवळच्या एका कला केंद्रावर सोडले. तिथे तिला नाचकाम करायला लावले. 

पोलिसांच्या तपासावर ताशेरे

दरम्यान, मंगळवारी या प्रकरणात अंबाजोगाई न्यायालयाने पोलिसांच्या तपासावर ताशेरे ओढले. या प्रकरणात आरोप झालेले पोलीस कर्मचारी अद्यापही तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना का सापडत नाहीत अशी विचारणा न्यायालयाने केली आहे. या पीडित मुलीने सुरुवातीला माहिती सांगितल्याप्रमाणे अंबाजोगाई पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. आणखी चार जणांना याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पीडितेने बालकल्याण समितीसमोर दिलेली माहिती अद्यापही पोलिसांसमोर येणे बाकी आहे. अशा प्रकारचा पुरवणी जबाब नोंद झाल्यानंतरच या संदर्भाने पुढील कारवाई होणार आहे. या प्रकरणी रोज नवीन गोष्टींचा खुलासा होत असून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here