Google search engine

Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356
Homeअनिल देशमुखांच्या प्रकरणाशी संबंधित पाच जणांना जामीन
Array

अनिल देशमुखांच्या प्रकरणाशी संबंधित पाच जणांना जामीन


Anil Deshmukh: मनी लॉड्रिंग प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अंनिल देशमुख यांच्यासह गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पाच चार्टर्ड अकाऊंटना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सत्र न्यायालयानं 3 लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केलाय. 

 

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी 20 मार्च रोजी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात देशमुख यांनी मुंबईतील हॉटेल आणि बारमधून 100 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले असल्याचा आरोप केला होता. त्यात बडतर्फ अधिकारी सचिन वाझेचा समावेश असल्याचे म्हटलं होतं. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या एफआयआरच्या आधारावर ईडीने 11 मे रोजी देशमुखांविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. याप्रकरणी देशमुख यांच्यासह पाच सीएविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी चार्टर्ड अकाउंटंट विनोद हसनी आणि विशाल खटवानी आणि सुरेंद्र कुमार जैन, वीरेंद्र कुमार जैन, किशोर दिवाणी यांना न्यायालयात विशेष न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्यासमोर हजर केले असता पाचही जणांना प्रत्येकी 3 लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर करत न्यायालयाने त्यांच्या नियमित जामीन याचिकांवर 2 डिसेंबर रोजी सुनावणी निश्चित केलीय.

 

” राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देखमुख यांना खोट्या प्रकरणात अडकवलं जातंय. यासाठी भाजपनं काही लोकांना पुढे केले आहे”, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नबाब मलिक यांनी केलाय. मुंबईत गुरुवारी (18 नोव्हेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

 

हे देखील वाचा- 

 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

 Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments