Aniket Vishwasrao : अनिकेत विश्वासरावविरोधात पत्नीकडून मारहाणीसह मानसिक-शारीरिक छळाची तक्रार<p>पुणे- मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्यावर अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीला मारहाण आणि मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी स्नेहा अनिकेत विश्वासराव (वय 29, रा. करिष्मा सोसायटी कोथरूड) &nbsp;यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेमुळे मराठी चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे.&nbsp;</p>
<p>स्नेहा विश्वासराव यांनी दिलेल्या फिर्यादीत करियरमध्ये आपल्यापेक्षा पत्नीचे नाव मोठे होईल या भीतीने गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच लोकांसमोर मारहाण करून अपमानास्पद वागणूक देत अतोनात छळ केल्याचेही म्हटले आहे. याप्रकरणी अनिकेत विश्वासरावसह त्याच्या आई-वडिलांवर ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.&nbsp;</p>
<p>अनिकेत मूळचा मुंबईचा आहे. 2018 मध्ये त्याचा आणि स्नेहा चव्हाणचा विवाह झाला आहे. स्नेहा यादेखील अभिनेत्री असून त्यांनी काही मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून त्या दोघांमध्ये ही सतत वाद होत होते. यातूनच स्नेहा यांनी अलंकार पोलिस ठाण्यात तक्रार दिली त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अलंकार पोलीस अधिक तपास करीत आहेत. अनिकेतने पोस्टर बॉईज,मस्का, बस स्टॉप या चित्रपटांमध्ये काम केले आहे. अनिकेतने अभिनयक्षेत्रातील पदार्पण नकळत सारे घडले या नाटकाद्वारे केले. तसेच त्याने &nbsp;ऊन-पाऊस आणि कळत नकळत या मालिकांमध्ये काम केले आहे.&nbsp;&nbsp;</p>Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here