Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

Solapur Accident : स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन परतताना जीपला अपघात, पाच जणांचा मृत्यू

Array


Solapur Accident News : स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन अक्कलकोटवरुन सोलापूरला जाणाऱ्या जीपचा टायर फुटल्यामुळे भीषण अपघात झालाय. या अपघातांमध्ये पाच जणांचा मृत्यू झालाय. मृतांची नावे अद्याप अस्पष्ट आहेत. या अपघातामध्ये पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात आणण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. कुंभारी जवळील गंगाप्रसाद पेट्रोलपंप समोर ही घटना घडली. एसटी बंद असल्याने सर्वजण सोलापूरकडे खासगी जीपने प्रवास करत होते, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. वळसंग पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून मदत पोहचवली जात आहे. 

स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन खासगी जीपनं (एमएच 13 एएक्स 1237) सोलापूरला जाताना कुंभारी गावाजवळ टायर फुटल्यानं अपघात झालाय. पुढील टायर फुटल्यामुळे जीप पलटी झाल्याचं समजतेय. या अपघात पाच जणांचा मृत्यू झालाय. तर सहा जण जखमी आहेत. मृताची संख्या वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

नुकत्याच झालेल्या कार्तिक एकादशीनिमित्त पंढरपूर, अक्कलकोट व गाणगापूर असा प्रवास करणाऱ्यांचा समावेश होता. स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन अक्कलकोटवरुन परतत असताना काळानं घाला घातला. जखमींवर जवळलील रुग्णालयात उपचार केले जात आहेत. अपघातातील लोकांची अद्याप ओळख पटलेली नाही. कुंभारी गावातील स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हा परिसर अपघातप्रवण क्षेत्र झालाय. या ठिकाणी आतापर्यंत पंधरा ते वीस मोटारसायकलचे अपघात झाले आहेत.Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here