Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर…

Array


महागाई काय मोदींनी वाढवली; विक्रम गोखले यांचा उलट प्रश्न

veteran actor Vikram Gokhale controversial statement : महागाई काय पंतप्रधान मोदींनी वाढवली का, असा उलट प्रश्न ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी केला. पुण्यात 75 व्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण महासंघाच्यावतीनं ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी महागाईवर विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना विक्रम गोखले यांनी हा उलट प्रश्न केला. विक्रम गोखले यांनी महागाईच्या प्रश्नावर म्हटले की, अनेकजण हॉटेलमध्ये जाऊन एकाच वेळी 10 हजार रुपये खर्च करतात. ओपेकमध्ये तेलाचे दर किती झाले हे माहित आहे का, एक माणूस 70 वर्षांची साचलेली घाण साफ करत आहे हे दिसत नाही का, अशा वेळी त्याच्या पाठिशी उभे रहायला हवं. पंतप्रधान मोदी देशासाठी काम करतात तेव्हा पाठिंबा आहे. मात्र, पक्षासाठी करत असतील तर पाठिंबा नाही, असेही विक्रम गोखले यांनी म्हटले. 

अमित शहा 26 नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर

अमित शहा 26 नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर येणार असल्याच नक्की झाला आहे.  या दौऱ्यात पुण्यातील वैकुंठभाई मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेशन या संस्थेत अमित शहांकच्या उपस्थितीत सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आलय. या कार्यक्रमानंतर अमित शहा पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देण्याचीही शक्यता आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे प्रमुख या नात्याने शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी अमित शहांची दिल्लीत भेट घेऊन त्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देण्याच आमंत्रण दिले आहे. केंद्र सरकारकडून सहकार मंत्रालय स्थापन करुन त्याची जबाबदारी अमित शहांनी घेतल्यानंतर महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात त्याच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या.  त्या पार्श्वभूमीवर अमित शहांच्या या पुणे दौऱ्याकडे सहकार क्षेत्राकडून उत्सुकतेनं बघितले जाणार आहे.

मलिक यांच्या मागे ईडीचा ससेमिरा ? ; वक्फ बोर्डातील घोटाळ्याप्रकरणी सात ठिकाणी छापा

एनसीबीच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करता करता भाजप नेत्यांविरोधात आरोपांचे बॉम्ब फोडणारे नवाब मलिक यांच्या अखत्यारीत येणाऱ्या वक्फ बोर्डामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. कथित जमीन घोटाळा प्रकरणी ईडीने  पुण्यातील वक्फ बोर्डाच्या सात ठिकाणांवर छापा मारला. Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here