Pune Auto Rickshaw fare : पुण्यात रिक्षा दरवाढीचा मीटर फास्ट; 22 नोव्हेंबरपासून नवे दर लागू


Pune Auto Rickshaw fare hike :  पुणेकरांना आता रिक्षा प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहे. पुणे जिल्ह्यात रिक्षा दरात भाडेवाढ करण्याचा निर्णय परिवहन विभागाने (Pune RTO) घेतला आहे. ही भाडेवाढ येत्या 22 नोव्हेंबरपासून लागू करण्यात येणार आहे.  पहिल्या दिड किलोमीटरसाठी आतापर्यंत अठरा रुपये द्यावे लागत होते.  मात्र आता त्यामध्ये तीन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता पहिल्या दीड किलोमीटरसाठी एकवीस रुपये मोजावे लागणार आहेत.

इंधन दरवाढ, महागाईच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून दरवाढीची मागणी रिक्षा संघटनांकडून सुरू होती. खटुवा समितीच्या शिफारस लागू करण्याची मागणी रिक्षा चालक संघटनांनी केली होती. त्यानंतर आता परिवहन विभागाने ही दरवाढ लागू केली आहे. याआधी दरवाढीच्या संदर्भात परिवहन कार्यालयात रिक्षा चालक संघटनांसोबत बैठक झाली होती. पुणे, पिंपरी-चिंचवड भागात जवळपास 90 हजार रिक्षा आहेत. 

असे असणार नवे दर

पहिल्या दिड किलोमीटरसाठी आतापर्यंत अठरा रुपये द्यावे लागत होते.  मात्र आता त्यामध्ये तीन रुपयांची वाढ करण्यात आली असून आता पहिल्या दीड किलोमीटरसाठी एकवीस रुपये मोजावे लागणार आहेत.  पहिल्या दीड किलोमीटर नंतरच्या प्रत्येक किलोमीटरला आतापर्यंत बारा रुपये एकतीस पैसै मोजावे लागत होते. आता त्यामधे एक रुपया 69 पैशांची वाढ करण्यात आली आहे. आता प्रत्येक किलोमीटरसाठी चौदा रुपये मोजावे लागणार आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात रात्री बारा ते पहाटे पाच या कालावधीत 25 टक्के अधिक भाडे रिक्षासाठी मोजावे लागणार आहे. तर जिल्ह्याच्या इतर भागामधे याच कालावधीत रिक्षासाठी चाळीस टक्के अधिक भाडे मोजावे लागणार आहे.

येत्या 22 नोव्हेंबरपासून नवे दर रिक्षा प्रवासासाठी लागू होणार आहेत. त्यामुळे नव्या दरांप्रमाणे मीटरचे सेटिंग बदलून घेणे रिक्षाचालकांना बंधनकारक राहणार आहे. जवळपास सहा वर्षानंतर रिक्षा दरवाढ करण्यात आली आहे.  

 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP MajhaSource link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here