Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

पोलिसांना दक्ष राहण्याच्या सूचना

Array


म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यात काही ठिकाणी झालेल्या हिंसाचारामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सोमवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. सर्व अधिकाऱ्यांकडून कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेऊन दक्ष राहण्याच्या सूचना पोलिस आयुक्तांनी दिल्या आहेत.

त्रिपुरामध्ये झालेल्या वादाप्रकरणी एका संघटनेने १२ नोव्हेंबरला पुकारलेल्या बंददरम्यान अमरावती, नांदेड, मालेगाव, पुसद या ठिकाणी हिंसाचार उफळून आला होता. त्यानंतर राज्यातील इतर शहरांत हिंसाचार झाला होता. या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली काही पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संवेदनशील भागातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्याशिवाय गंभीर घटना टाळण्यासाठी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह उपायुक्तांनी बारकाईने लक्ष ठेवावे, असे सांगण्यात आले आहे. हिंसाचार घटनेचा गैरफायदा घेऊन व्हॉटसअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पोस्ट व्हारयल करून तेढ निर्माण होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याची सूचना पोलिस आयुक्तांनी दिल्या आहेत. त्यानुसार सायबर सेलचे पोलिसदेखील अशा अक्षेपाहार्य पोस्टवर लक्ष ठेवून आहेत.Source link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here