Notice: Array to string conversion in /home/vmnews/domains/vartmanmaharashtra.in/public_html/wp-includes/shortcodes.php on line 356

अंथरुणाला खिळलेला स्वत:च्या पायावर उभा

Arrayम. टा. प्रतिनिधी,

‘स्लिप डिस्क’ आणि ‘सायटिका’ या आजाराचा एकत्रित परिणाम म्हणून ‘कॉडा इक्विना सिंड्रोम’मुळे (सीईएस) अंथरुणाला खिळलेल्या ३५ वर्षीय तरुणाला शस्त्रक्रियेनंतर चालता येणे शक्य झाले आहे.

अजय चव्हाण (नाव बदलले आहे) या तरुणाला अचानक कमरेत खूप वेदना होऊ लागल्या. दोन्ही पायात कळ येऊ लागली. वेदना कमी करण्यासाठी त्याने घरगुती उपचारांवर भर दिला. शस्त्रक्रियेच्या भीतीने स्टेरॉइडचे इंजेक्शन; तसेच नस बधीर करणारी वेदनाशामक औषधेही घेतली. मात्र, वेदना असह्य झाल्याने त्याला उभे राहणेही अवघड झाले. कालांतराने अजय अंथरुणाला खिळला. पाय बधीर झाले आणि पंजातील ताकदही कमी झाली. अजयची प्रकृती बिघडत असल्याचे पाहून कुटुंबीयांनी त्याला ‘अपोलो स्पेक्ट्रा’ रुग्णालयात दाखल केले.

रुग्णालयातील मणकाविकारतज्ज्ञ डॉ. आनंद कवी म्हणाले, ‘रुग्णाला उपचारासाठी आणले, त्या वेळी चालताही येत नव्हते. वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर कमरेच्या तिसऱ्या आणि चौथ्या मणक्यातील गादी मागे सरकल्याने पायाकडे जाणारे मज्जातंतू दाबले गेल्याचे निदान झाले. त्यामुळे शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. दुर्बिणीच्या शस्त्रक्रियेत चीरफाड करावी लागत नाही आणि टाकेही घालावे लागत नाहीत. ही शस्त्रक्रिया पूर्ण भूल न देता आवश्यक तेवढीच जागा बधीर करून करण्यात आली. शस्त्रक्रियेद्वारे मज्जातंतूवरील दाब कमी करण्यात आला.’

अनेकदा पाठीच्या कण्यात वेदना होत असल्यास शस्त्रक्रियेच्या भीतीने रुग्ण स्वतःच औषधे घेतो. वेळीच निदान आणि उपचार न झाल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. म्हणून कमरेत आणि पायात तीव्र वेदना होत असतील, कमर तिरकी झाली असेल, टाचा किंवा गुडघे दुखत असतील, पायात जडपणा किंवा बधीरपणा आल्यास. उभे राहिल्यावर किंवा चालल्यावर पायात मुंग्या येणे, तळव्यांची किंवा पायाची जळजळ होत असल्यास तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असेही डॉ. कवी यांनी सांगितले.

कॉडा इक्विना सिंड्रोम हा आजार प्रामुख्याने स्लिप डिस्कमुळेच होतो. पायाकडे जाणाऱ्या नसेवर दाब पडल्याने मज्जातंतू दाबले जातात. परिणामी, लघवी आणि शौचावरील नियंत्रण सुटते. त्यामुळे शस्त्रक्रिया करणे हाच एकमेव पर्याय राहतो.

डॉ. आनंद कवी, मणकाविकार तज्ज्ञSource link

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here